एक्स्प्लोर
Advertisement
तीन इंचानी उंची वाढवण्यासाठी तरुणाची पाय कापून शस्त्रक्रिया
हैदराबाद : निसर्गतः मिळालेलं शरीर आणि रुप यात फारसा बदल करता येत नाही, असं म्हणतात. मात्र अत्याधुनिक शास्त्रांच्या आधारे अघोरी उपाय करुन तथाकथित सौंदर्याच्या व्याख्यांमध्ये बसण्याचा प्रयत्न अनेकांकडून होतो. अशीच एक शस्त्रक्रिया अंगलट आल्याचं उदाहरण हैदराबादमध्ये समोर आलं आहे.
5 फूट 7 इंच इतकी उंची कोणालाही हेवा वाटावी अशीच. मात्र असं असूनही आणखी 3 इंचांनी उंच होण्याचा हव्यास 22 वर्षीय तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. तब्बल 7 लाख रुपये मोजून निखिल रेड्डीने उंच होण्यासाठी पाय कापून त्यात रॉड बसवण्याची शस्त्रक्रिया केली.
निखिलने करवून घेतलेली ही ऑर्थोपेडिक सर्जरी तब्बल 7 तास चालली. विशेष म्हणजे कोणी अडथळा आणू नये यासाठी त्याने आपल्या कुटुंबीयांच्या नकळत ही शस्त्रक्रिया करुन घेतली. ऑपरेशन टेबलवर जाण्यापूर्वी हैदराबादमधील एका प्रसिद्ध रुग्णालयाला त्याने 4 लाख रुपये दिली आणि आपला मोबाईल फोन स्वीच ऑफ केला.
तीन दिवस मुलाचा थांगपत्ता न लागल्यामुळे निखिलच्या आई-वडिलांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे निखिलचा शोध लावला आणि प्रकरणाचा उलगडा झाला. रेड्डी दाम्पत्याने आपल्या परवानगीविना मुलाचं ऑपरेशन केल्याप्रकरणी हॉस्पिटलला धारेवर धरलं आहे, तर मुलगा 18 वर्षांवरील असल्यामुळे पालकांची संमती आवश्यक नसल्याचा बचावात्मक पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement