(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Holi | अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी दिल्या होळीच्या शुभेच्छा, म्हणाल्या...
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळी हा सण मतभेद विसरून एकत्र येण्याचा सण असल्याचं त्या म्हणाल्या.
नवी दिल्ली : आज देशभर होळीचा सण साजरा करण्यात येत आहे. या प्रसंगी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळी हा आपापसातले मतभेद विसरून एकत्र येण्याचा सण असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी आपल्या ट्वीट्च्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या की, "होळीच्या खूप शुभेच्छा, होळी हा रंगांचा सण आहे. हा रंग आपल्या जवळच्या आणि आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना लावला जातो. होळीचा सण हा सकारात्मक विचारांनी भरलेला असतो. या दिवशी आपण सर्वांनी आपापासातले मतभेद विसरून एकत्र यायला हवं."
Happy Holi! Holi is best known for vibrant colors that are tossed at friends and loved ones. Full of joy, Holi is all about positivity, setting aside our differences, and coming together. A message that’s been embodied by communities across the world during these tough times.
— Vice President Kamala Harris (@VP) March 28, 2021
अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर भारतीय वंशाचे लोक राहत आहेत. तसेच जगभरातही अनेक देशात भारतीय वंशाच्या लोकांचे वास्तव्य आहे. ते आज मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करत आहेत.
कमला हॅरिस यांच्या सोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही भारतीयांना आणि ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या भारतीय लोकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Wishing our Hindu Australian community, my good friend @narendramodi and all the people who are celebrating it, a happy and colourful Holi!
— Scott Morrison (@ScottMorrisonMP) March 28, 2021
होली की शुभकामनाएँ। pic.twitter.com/rjz1MA8gHJ
महत्वाच्या बातम्या :
- पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशात हिंसाचार, कट्टरपंथियांकडून हिंदू मंदिरावर हल्ला
- Myanmar coup: म्यानमारमध्ये रक्तरंजित रविवार, लष्करशाहीविरोधात प्रदर्शन करणाऱ्या 114 हून अधिक लोकांना मारण्यात आल्याचे वृत्त
- Suez Canal | कार्गो शिपने केला सुएज कालवा 'ब्लॉक', जगाचं तासाला 2800 कोटी रुपयांचं नुकसान