Holi 2022 : देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा, जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिकांनी जवानांसोबत केली रंगांची उधळण
Holi 2022 : देशभरात आज होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिकांनी जवानांसोबत रंगांची उधळण करून होळी साजरी केली.
Holi 2022 : भारत देशातील विविध भागात विविध संस्कृती जपली जाते. येथे सणांनाही फार महत्त्व आहे. येथील प्रत्येक सण गुण्यागोविंदाने साजरा केला जातो. इतर सणांप्रमाणे होळीच्या सणाला देखील तितकंच महत्व आहे. आज देशभर होळी उत्साहात साजरी केली जात आहे. राजकीय नेतेमंडळींपासून सेलीब्रेटीही आज होळी साजरी करत आहेत. देशातील सर्वच राज्यात होळी साजरी केली जात आहे.
#WATCH Maharashtra | Children play #Holi with each other with colours and water guns in Pune pic.twitter.com/OWcFqFiAoK
— ANI (@ANI) March 18, 2022
महाराष्ट्रातील विविध भागात आज होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. राज्यातील बीडमध्ये आजच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. तर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सुरगांव येथे रंगाविना धुळीवंदन सोहळा साजरा केला जातो. येथील नागरिक रंगांची उधळण नाही तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची उधळण करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करीत आहेत. तर पुण्यात मुले वॉटर गनने एकमेकांना रंग लावून होळी खेळतात.
#WATCH | Himachal Pradesh Chief Minister Jai Ram Thakur celebrates #Holi at his residence in Shimla pic.twitter.com/TcaiK54MTU
— ANI (@ANI) March 18, 2022
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी त्यांच्या शिमला येथील निवासस्थानी होळी साजरी केली आहे. यावेळी या उत्सवात असंख्य लोक सहभागी झाले होते.
#WATCH | People were seen dancing with joy while playing Holi with each other in Uttar Pradesh's Prayagraj pic.twitter.com/jCIngsO0Fg
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 18, 2022
उत्तर प्रदेशमध्येही होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये मोख्या संख्येने लोक एकत्र जमा होऊन होळीचा आनंद साजरा करत आहेत. लोक गाण्यांच्या तालावर बेभान होऊन नृत्य करत आहेत.
#WATCH Assam | Multitudnous crowd of people celebrate #Holi with colours while dancing to the tunes of songs in Guwahati pic.twitter.com/M1CfX1jgBD
— ANI (@ANI) March 18, 2022
आसाममधील गुवाहाटीमध्ये नागरिकांनी गाण्यांच्या तालावर नाचत रंगांची उधळण केली. पाणी पुवठा करण्याच्या टॅंकरध्ये रंग करून टॅंकरच्या पाईपने लोकांवर रंगाचा वर्षाव केला जात आहे.
Andhra Pradesh | #Holi celebrations underway with full vigour in Vijayawada. pic.twitter.com/q3hJlCOmZB
— ANI (@ANI) March 18, 2022
आंध्र प्रदेश मधील विजयवाड्यात लहान मुलांसह नागरिकांनी रंगांची उधळण करत होळी उत्साहात साजरी केली आहे.
Telangana | People celebrate #Holi with colours, gulaal and tomatoes in Hyderabad. pic.twitter.com/kR0jUPkLTj
— ANI (@ANI) March 18, 2022
हैदराबादमध्ये नागरिकांनी रंग, गुलाल आणि टोमॅटोने होळी साजरी केली. यावेळी लोकांनी एकमेकांना टोमॅटो फेकून मारत आनंद साजरा केला.
Rajasthan | Tourists, and locals play #Holi with colours and gulal in Pushkar pic.twitter.com/aLLQ9usNwR
— ANI (@ANI) March 18, 2022
राजस्थानमध्ये पर्यटक आणि स्थानिक लोक रंग आणि गुलाल एकमेकांना लावून होळी खेळतात. हजारो लोकांनी एकत्र येत रंग उधळून होळी साजरी केली.
#WATCH | Locals of Boniyar, Baramulla district dance and celebrate #Holi with Indian Army jawans in remote areas of the district in Jammu and Kashmir.
— ANI (@ANI) March 18, 2022
(Source: Indian Army) pic.twitter.com/R6Poq7HVSH
जम्मू आणि काश्मीरमधील जिल्ह्यातील दुर्गम भागात भारतीय लष्कराच्या जवानांसोबत स्थानिक लोक नाचून होळी साजरी करतात. बोनियार आणि बारामुल्लामध्येही स्थानिक लोक जवानांसोबत होळी साजरी करतात.
Congress leader Sandeep Dikshit celebrates #Holi in Delhi
— ANI (@ANI) March 18, 2022
He says, "Party strengthens when it works as a family. In a family, there's equality, justice & youngsters-elders. Elders are respected & youngsters are loved. Party workers want leadership to consider everyone their own" pic.twitter.com/UjixrxlRjf
काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी दिल्लीत होळी साजरी केली. यावेळी ते म्हणाले, "कुटुंबाप्रमाणे काम केल्यानंतर पक्ष बळकट होतो. कुटुंबात समता आणि न्याय असतो. तर कुटुंबात ज्येष्ठांचा आदर केला जातो आणि तरुणांवर प्रेम केले जाते. पक्ष कार्यकर्त्यांना नेतृत्वाने आपले मानले पाहिजे"