(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Jodo Yatra: का काढली भारत जोडो यात्रा? राहुल गांधी म्हणाले...
Bharat Jodo Yatra: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gnadhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा हिमाचल प्रदेशात दाखल झाली आहे.
Bharat Jodo Yatra: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gnadhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा हिमाचल प्रदेशात दाखल झाली आहे. यावेळी त्यांनी कांगडा येथील सभेत ही यात्रा का काढली, हे सांगितले. तसेच त्यांनी या सभेत मोदी सरकारवर हल्लाबोल करत देशात वाढत्या बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Bharat Jodo Yatra: '..म्हणून भारत जोडो यात्रा काढायचे ठरवले.'
सभेतील संबोधित करताना राहुल गांधी (Rahul Gnadhi) म्हणाले की, "संसदेत बोलताना आमचे माईक बंद केले जात होते. आम्ही नोटाबंदी, जीएसटी आणि अग्निपथ योजनाबद्दल बोलो, मात्र ते दाखवण्यात आलं नाही. सरकारने न्यायव्यवस्थेवर दबाव आणला. सीबीआय आणि ईडीही दबाव निर्माण करत आहेत. अशा परिस्थितीत महागाई, बेरोजगारी यांसारखे प्रश्न मांडण्याची गरज आहे, असे मला वाटले. म्हणूनच आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढण्याचे ठरवले.''
Bharat Jodo Yatra: 'सुरुवातीला वाटले होते की आपण खचून जाऊ'
राहुल गांधी म्हणाले की, ''मी कन्याकुमारीतून 125 लोकांसोबत भारत जोडो यात्रा सुरू केली होती, पण आज लाखो लोक त्यात सामील झाले. तरुण आणि शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही समजून घेतल्या. सुरुवातीला वाटले होते की आपण खचून जाऊ पण तसे झाले नाही.'' राहुल गांधी म्हणाले की, देशात द्वेष आणि हिंसाचाराचे वातावरण आहे. द्वेष, महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात उभे राहायचे असेल तर आमच्यासमोर भारताच्या रस्त्यांवर चालण्याचा मार्ग होता. ते म्हणाले की, केंद्र सरकारची सर्व धोरणे, नोटाबंदी, जीएसटी (GST) आणि शेतीविरोधी कायदा हे तीन-चार अब्जाधीशांना फायदा मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.
LIVE: #BharatJodoYatra | Ghatota to Indora | Kangra | Himachal Pradesh | #JudRahaHaiBharat https://t.co/AUinciqUqe
— Bharat Jodo (@bharatjodo) January 18, 2023
Bharat Jodo Yatra: 30 जानेवारी रोजी होईल भारत जोडो यात्रेचा समारोप
दरम्यान, तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा समारोप 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये होईल. येथे राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये भारताचा राष्ट्रध्वज फडकवतील. ही यात्रा आत्तापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून निघाली आहे.