(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP C-Voter Opinion Poll 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये कुणाला किती जागा मिळणार? ओपिनियन पोलमध्ये खुलासा
Himachal Pradesh Opinion Poll 2022 : निवडणूक आयोगानं शुक्रवारी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा केली
Himachal Pradesh Opinion Poll 2022 : निवडणूक आयोगानं शुक्रवारी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील जनतेलाच कौल जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजने सी व्होटरच्या मदतीनं ओपिनिअन पोल घेतला आहे. आजच्या सर्व्हेमध्ये मर्जिन ऑफ एरर प्लस मायनेस तीन पाच टक्के असेल. एक ते 14 ऑक्टोबर दरम्यान हा ओपिनिअन पोल घेण्यात आला आहे. यामध्ये सहा हजार 245 जणांनी सहभाहग नोंदवलाय.
हिमाचल प्रदेशमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? असा प्रश्न सर्व्हेमध्ये विचारण्यात आला होता. यामध्ये सहा हजार पेक्षा जास्त लोकांनी आपलं मत नोंदवलं. सर्वेनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार येण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला 38 ते 46 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 20 ते 28 जागा मिळतील. आप पक्षाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर जागांवर 3 जण निवडणूक येण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये कुणाला किती जागा मिळणार?
स्रोत- सी व्होटर
भाजप - 38-46
काँग्रेस- 20-28
आप- 0-1
अन्य - 0-3
नोट- abp न्यूजसाठी सी व्होटरनं ओपिनिअन पोल केला. यामध्ये सर्व जाती-धर्मांच्या लोकांचं मत जाणून घेतलं. या सर्व्हेमध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस तीन ते पाच टक्के असेल. सर्व्हेचा कौल लोकांनी दिलेल्या उत्तरावर आहे. यासाठी एबीपी न्यूजचा जबाबदार नाही.
दरम्यान, हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ जानेवारीला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे. हिमाचलमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुका चार टप्प्यात झाल्या. निवडणुकीत भाजपने 68 पैकी 44 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. आता यंदाच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या हिमाचलमध्ये एकूण 68 जागा आहेत. बहुमतासाठी 35 जागांची गरज आहे. हिमाचलमध्ये सध्या 53 लाख 76 हजार 77 रजिस्टर्ड मतदार आहेत. 2017 साली झालेल्या निवडणुकीत 75.28 टक्के मतदान झाले.
एकाच टप्प्यात मतदान होणार
अर्ज भरण्याची सुरुवात- 17 ऑक्टोबर 2022
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 25 ऑक्टोबर 2022
अर्जाची छानणी- 27 ऑक्टोबर 2022
नाव माघारी घेण्याची मुदत- 29 ऑक्टोबर 2022
मतदान- 12 नोव्हेंबर 2022
मतमोजणी/निकाल- 8 डिसेंबर 2022