राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
Monsoon Latest Updates: राज्यात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा, शनिवारपासून राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी, मुंबईसह किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसरात पावसाचा अंदाज
![राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार? Heavy rain warning in state from Saturday heavy pre monsoon showers in state rain forecast in coastal and Western Ghats areas including Mumbai Maharashtra Monsoon Latest Updates Know Details राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/10/7f34ce0980de54c7846f10693a8563bd1712712146246322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Monsoon Latest Updates LIVE: मुंबई : मान्सूनचं महाराष्ट्रातील (Monsoon Updates) आगमन काही तासांवर येऊन ठेपलं आहे. गोव्यात दाखल होत मान्सून महाराष्ट्राच्या (Maharashtra Wether Updates) उंबरठ्यावर पोहोचला आहे. आज मान्सून तळ कोकणातील (Konkan Rains) सिंधुदुर्ग (Sindhudurg Rains), रत्नागिरी (Ratnagiri Rains), पश्चिम महाराष्ट्रातील पुणे (Pune Rain), सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे. तर 10 जूनपर्यंत विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती होण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.
राज्यात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा
राज्यात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागान दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पाऊस मंगळवारी (4 जून) गोव्यात दाखल झाला होता. मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे बुधवारी (5 मे) तळकोकणात पाऊस दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात पाऊस गोव्यातच अडखलला आहे. सिंधुदुर्गमध्ये बुधवारी ढगाळ वातावरण तयार झाले होते. तापमानात घटही झाली आहे. सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी हलका पाऊसही झाला. पण, तो पूर्वमोसमी होता. गुरुवारी (6 जून) मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आज आणि उद्या दक्षिण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता
आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता असून हवामान खात्यानं असा अंदाज वर्तवला आहे. MAHARASHTRA DGIPR नं ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर, उद्या दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग, बुलढाण्यात मान्सूनपूर्व पावसाची हेजरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे. कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी, दोडामार्ग तालुक्यात पावसानं हजेरी लावली तर अन्य भागांत काळोख दाटला आहे. हवामान विभागानं आज, उद्या जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे. कोसळत असलेल्या पावसामुळे हवेत मोठा गारवा निर्माण झाला, त्यामुळे उष्णतेनं हैराण झालेल्या लोकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे बबुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागांत सकाळपासून जोरदार मान्सून पूर्व पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील खामगाव, जळगाव जामोद, मोताळा, परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसानं शेतकरी सुखावला असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.
मुंबईतही कोसळधारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (8 जून) आणि रविवारी (9 जून) रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्याच्या अन्य भागांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. रविवारपासून पुढील दोन दिवस मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह पश्चिम घाटात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भासह राज्याच्या बहुतेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)