एक्स्प्लोर
HDFC चा दणका, ATM मधून पाचव्यांदा पैसे काढताना 150 रुपये फी
मुंबई : कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळी पावलं उचलली जात आहेत. एचडीएफसी बँकेनेही यात उडी घेतली आहे, मात्र रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण आता सेव्हिंग्ज किंवा सॅलरी अकाऊण्टमधून एटीएममधून पैसे काढण्यावरही आता बंधनं येणार आहेत.
एचडीएफसीच्या सॅलरी अकाऊण्टमधून पैसे काढण्याला आतापर्यंत कोणतीही बंधनं नव्हती. मात्र यापुढे खात्यातले पैसे एटीएममधून काढताना दर महिन्याला फक्त पहिली चार ट्रँझॅक्शन मोफत असतील. त्यानंतर पाचव्या ट्रँझॅक्शनला तब्बल दीडशे रुपये आकारले जाणार आहेत. या 150 रुपयांव्यतिरिक्त कर आणि सेस लागू होईल.
म्हणजे तुम्हाला शंभर रुपये काढायचे असतील तरी तुम्हाला त्याव्यतिरिक्त 150 रुपयांपेक्षा जास्त रक्कम फी म्हणून द्यावी लागेल. 1 मार्च 2017 पासून हा निर्णय लागू होणार असून नोकरदारांच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली आहे.
एसबी मॅक्स ग्राहकांना सॅलरी खात्यातले पैसे एटीएममधून काढताना दर महिन्याला पहिली पाच ट्रँझॅक्शन मोफत असतील. त्यानंतर सहाव्या ट्रँझॅक्शनला दीडशे रुपये आकारले जातील. या 150 रुपयांव्यतिरिक्त कर आणि सेस लागू होईल.
एचडीएफसीच्या होम ब्रँचमधून दर दिवशी दोन लाखांपर्यंतचे व्यवहार (विड्रॉ किंवा डिपॉझिट) मोफत असतील, त्यानंतर पुढील प्रत्येक एक हजार रुपयांमागे पाच रुपये आकारले जातील. मात्र किमान 150 रुपये आकारले जाणार असल्याचं बँकेने स्पष्ट केलं आहे. म्हणजेच 2 लाख 1 हजार रुपये काढले किंवा भरले तरी दीडशे रुपये चार्ज केले जातील.
नॉन होम ब्रँचमधून दर दिवशी 25 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार (विड्रॉ किंवा डिपॉझिट) मोफत असतील. त्यानंतर पुढील प्रत्येक एक हजार रुपयांमागे पाच रुपये आकारले जातील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement