एक्स्प्लोर
कर्नाटकात कुमारस्वामींनी विश्वासमत जिंकलं, भाजपचा सभात्याग
कर्नाटकात जेडीएस आणि काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं असून भाजपने विधानसभेतून सभात्याग केल्यानंतर कुमारस्वामींनी विश्वासमत जिंकलं
बंगळुरु : कर्नाटकात कुमारस्वामी सरकारला विश्वासमत जिंकण्यात यश आलं आहे. त्यामुळे कर्नाटकात जेडीएस आणि काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं आहे. यावेळी भाजपने विधानसभेतून सभात्याग केला.
विरोधीपक्ष नेते बी एस येडियुरप्पा यांनी सत्ताधारी युती अभद्र असल्याची टीका केली. कुमारस्वामी यांनी मात्र सत्ता चालवताना विरोधकांची मतं विचारात घेण्याचं आश्वासन दिलं आहे.
दोन दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी शपथ घेतली. त्यांना 15 दिवसात बहुमत सिद्ध करा, असं राज्यपाल वाजूभाई वाला यांनी सांगितलं. पण कुमारस्वामी यांनी दोनच दिवसात बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसचे 78 आणि जेडीएसचे 38 असे 116 तसंच एका अपक्षासह 117 आमदार असल्याचा दावा काँग्रेस-जेडीएस आघाडीने केला होता.
15 मे रोजी निकाल लागल्यापासून 9 दिवस दोन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेल आणि रिसॉर्टमध्येच ठेवले आहे.
कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री, जी परमेश्वर उपमुख्यमंत्री!
भाजप सर्वात मोठा पक्ष
224 पैकी 222 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 104 जागा मिळवल्या. त्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करत, येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर कर्नाटक विधानसभा निकालाचा वाद सुप्रीम कोर्टात गेला.
55 तासात येडियुरप्पांचा राजीनामा
येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर 19 मे रोजी अवघ्या 55 तासात म्हणजेच अडीच दिवसात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं.
सुप्रीम कोर्टाने भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 19 मे रोजी दुपारची मुदत दिली होती. भाजपला बहुमताचा 112 हा आकडा गाठणं अशक्य होतं. पण तरीही आम्ही बहुमत सिद्ध करु, असा दावा भाजप आणि येडियुरप्पांकडून करण्यात येत होता. पण त्यांना ते शक्य झालं नाही.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018
भाजप 104
काँग्रेस 78
जनता दल (सेक्युलर) 37
बहुजन समाज पार्टी 1
कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
अपक्ष 1
संबंधित बातम्या
कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री, जी परमेश्वर उपमुख्यमंत्री!
कुमारस्वामींच्या शपथविधीत विरोधकांची एकमेकांवर 'माया-ममता'
कर्नाटकच्या राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा ठेवत राजीनामा द्यावा : शरद पवार
शपथविधी ते येडियुरप्पांचा राजीनामा, 55 तासात नेमकं काय घडलं?
कर्नाटकात इतका चिखल करुनही कमळ का नाही फुललं?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement