Hathras Case Live Updates: मोठ्या संख्येने पीडितेच्या गावात पोहोचले समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते, 144 कलमाचं उल्लंघन केल्यानं पोलिसांनी केला लाठिचार्ज
हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन केली जात आहेत. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात एबीपी न्यूजच्या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर सिंह, क्षेत्राधिकारी (सीओ) राम शब्द, पोलीस निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, उपनिरीक्षक जगवीर सिंग आणि महेश पाल यांना निलंबित करण्यात आले आहे. हाथरस प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई केली आहे. तसेच दोन्ही पक्षांची (पीडित आणि आरोपी) नार्को टेस्ट केली जाणार आहे.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज पुन्हा हाथरसला जाऊ शकतात, 1 ऑक्टोबर रोजी हाथरसला निघालेल्या राहुल गांधींना धक्काबुक्की करण्यात आली होती. तसंच त्यांना अटक देखील केली गेली होती.
हाथरसमध्ये एबीपीला रिपोर्टिंग करण्यापासून रोखलं, #AbpKoMatRoko ट्विटरवर तिसऱ्या नंबरवर ट्रेडिंग हॅशटॅग
लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे. आणि भारतातील उत्तर प्रदेशमध्ये पत्रकारितेसोबत असं घडतंय. हाच न्यू इंडियाची घोषणा होती ? मी पत्रकार प्रतिमा मिश्रा यांना सलाम करतो. ज्यांनी सत्य दाखवण्याची हिंमत केली.
पार्श्वभूमी
मुंबई: उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. देशभरात या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन केली जात आहेत. माध्यमांना या गावात जाण्यासाठी प्रशासनाकडून बंदी घालण्यात येत आहे. या प्रशासनाच्या भूमिकेच्या विरोधात एबीपी न्यूजच्या रिपोर्टर प्रतिमा मिश्रा यांनी तिथंच ठिय्या आंदोलन सुरु केलंय. सध्या #ABPKoMatRoko हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टर प्रतिमा मिश्राला रिपोर्टिंग करण्यापासून रोखलं गेलं. तिने तिथेच ठिय्या दिला आहे.
एबीपी न्यूज हाथरसमध्ये सातत्यानं रिपोर्टिंग करत आहे. मात्र पीडितेच्या परिवाराशी संपर्क करु दिला जात नाही. तसंच माध्यमांना गावात जाण्यापासून रोखलं जात आहे. तिथं वार्तांकन करणाऱ्या एबीपीच्या रिपोर्टर प्रतिमा मिश्रा यांना रोखण्यात आलं तसंच कॅमेरापर्सनला देखील पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली.
राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. राहुल गांधी यांना कलम 188 अंतर्गत अटक करण्यात आली होती. हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पायी चालत निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं आणि राहुल गांधी यांना अटक केली. तुम्ही मला का आणि कोणत्या कलमांतर्गत अटक करत आहात, असा प्रश्न राहुल गांधी यांनी अटकेपूर्वी पोलिसांना केला होता. परंतु कलम 144 लागू असल्याने आम्ही तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही, असं उत्तर पोलिसांनी त्यांना दिलं. यानंतर काही वेळाने राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केली. राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला रवाना झाले. मात्र त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यानंतर राहुल आणि प्रियंका यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र एका ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी " ये देखो आज का हिंदुस्तान," असं राहुल गांधी एबीपी माझाच्या प्रतिनिधीशी बोलत होते. त्याचवेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले. यानंतर उठून ते पुन्हा चालू लागले.
14 सप्टेंबर रोजी पाशवी अत्याचार, 29 सप्टेंबरला अखेरचा श्वास
14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. यानंतर तिला अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला सोमवारी (28 सप्टेंबर) दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तिने मंगळवारी सकाळी प्राण सोडले. या प्रकरणातील चार आरोपींना पकडलं असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
SIT कडून प्रकरणाचा तपास
हाथरस बलात्कार प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. यमुना एक्स्प्रेसवर ताफा अडवल्याने काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पायी हाथरसच्या दिशेने रवाना झाले आहेत. पीडितेच्या मृत्यूनंतर रोष वाढल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यीय एसआयटीची स्थापना केली आहे. सोबतच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना लवकरात लवकर शिक्षा देण्याचे निर्देशही दिले आहेत.
संबंधित बातम्या
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -