एक्स्प्लोर

Hathras Case : हाथरस प्रकरणातील तीन आरोपींची निर्दोष सुटका, एका आरोपीला जन्मठेप; बलात्कार झालाच नाही

Hathras Rape Case : उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. आता अडीच वर्षानंतर या प्रकरणात न्यायालयाने निकाल दिला आहे.

Hathras Rape Case : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) चर्चित हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एका आरोपीला हत्येच्या आरोपाखाली जन्मठेप देण्यात आली आहे. या प्रकरणात पीडितेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊ शकलेला नाही. हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशासह उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला

2020 साली घडलेल्या या प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. आता हाथरस प्रकरणात विशेष SC-ST न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणात, एका आरोपीवर निर्दोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर पीडितेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा गुन्हा सिद्ध न झाल्याने या प्रकरणातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याबाबत पीडित कुटुंबिय उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.

14 सप्टेंबर 2020 रोजी सामूहिक अत्याचार, 29 सप्टेंबरला अखेरचा श्वास

14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. यानंतर तिला अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला सोमवारी (28 सप्टेंबर) दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तिने मंगळवारी सकाळी प्राण सोडले. या प्रकरणातील चार आरोपींना पकडलं असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

14 सप्टेंबर 2020 रोजी हाथरसमधील चांदपा भागातील एका गावात एक दलित मुलगी गंभीर जखमी अवस्थेत सापडली होती. मुलीच्या भावाने गावातीलच संदीप ठाकूरविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. सामूहिक बलात्कार झाल्याचे पीडितेनं निवेदनात सांगितलं. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे 26 सप्टेंबर रोजी संदीप, लवकुश, रामू आणि रवी सिंह यांना या अटक करण्यात आली.  तेव्हापासून चार आरोपी तुरुंगात होते. यानंतर पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला प्रथम अलीगड आणि नंतर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 29 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला.

परवानगीशिवाय पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

पोलिसांनी परवानगीशिवाय पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला होता. अंत्यसंस्काराचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात या घटनेवर निषेध व्यक्त करण्यात आला. ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. यानंतर सरकारने या प्रकरणात पाच पोलिसांना निलंबित केलं होतं. एसआयटी स्थापन करण्यात आली. नंतर 11 ऑक्टोबरला तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने 104 साक्षीदारांपैकी 35 जणांची साक्ष घेतली. 67 दिवसांच्या तपासानंतर सीबीआयने 18 डिसेंबर 2020 रोजी चार आरोपींविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget