Haryana Violence : चार तास बुलडोजर चालवला, रोहिंग्यांच्या 200 झोपड्या जमीनदोस्त; नूह हिंसाचारानंतर हरियाणा सरकारची मोठी कारवाई
Nuh Violence: हरियाणामधील मेवात नूह या ठिकाणी 31 जुलै रोजी हिंसाचार झाला होता. त्यामध्ये दोन होमगार्डसहित सहा लोकांचा मृत्यू झाला होता.
Nuh Violence: हरियाणातील मेवात नूह (Nuh Violence Update) या ठिकाणी झालेल्या दंगलीनंतर आता पोलिसांचे डोळे उघडले आहेत. पोलिसांनी या दंगलीचा तपास सुरू करताना अवैध अतिक्रमाणाविरोधात मोठी अॅक्शन घेतली आहे. पोलिसांनी नूहच्या जवळच असलेल्या तावडू रोहिंग्या आणि इतर अवैध अतिक्रमण करणाऱ्या 200 झोपड्या जमीनदोस्त केल्या आहेत. या ठिकाणी अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या लोकांचा या दंगलमीध्ये सहभाग असल्याचं पोलिस तपासातून उघड झालं आहे.
या रोहिंग्या लोकांनी हरियाणा सरकारच्या शहरी विकास प्राधिकरणाच्या जमिनीवर कब्जा मिळवला आणि त्या ठिकाणी झोपड्या बांधल्याचं सांगितलं जातंय. नूहमध्ये झालेल्या हिंसाचारात या ठिकाणच्या लोकांचा सहभाग असल्याचं तपासात उघड झाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी बुलडोझर लावले आणि सर्व अवैध झोपड्या उद्ध्वस्त केल्या. या झोपड्यांमध्ये बांग्लादेशी लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत असल्याचं समोर आलं आहे.
आतापर्यंत 39 FIR, 176 जणांना अटक
हरियाणात झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी आतापर्यंत पाच जिल्ह्यांमध्ये 93 एफआयआर नोंद केल्या आहेत. तर आतापर्यंत 176 लोकांना अटक केली आहे. एकट्या नूहमध्ये 46 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. 31 जुलै रोजी नूह मध्ये एका शोभायात्रेवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर या ठिकाणी दंगल उसळली.
दरम्यान, या दंगलीत सामील असलेल्यांपैकी कुणालाही सोडणार नाही, सर्वांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितलं आहे.
मैं किसी भी कीमत पर प्रदेश की शांति और सांप्रदायिक सौहार्द को बिगड़ने नहीं दूंगा...
— Manohar Lal (@mlkhattar) August 2, 2023
नूंह की घटना के हर एक अपराधी को कानून के माध्यम से उनके अंजाम तक पहुंचाया जाएगा।
और वहां हुए हर एक नुकसान की भरपाई दंगाइयों से ही होगी और उन्हीं से उसकी वसूली भी करवाई जाएगी।
हरयाणातील दंगल पूर्वनियोजित, पोलिस तपासातून उघड
नूहमध्ये झालेली दंगल ही पूर्वनियोजित असल्याचं पोलिस तपासातून उघड झाले आहे. यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी बहुतांश आरोपी हे 19 ते 25 वयोगटातील असल्याचं दिसून येतंय. या तरुणांनी दंगलीमध्ये सामील होऊन अवैध शस्त्रांसह फायरिंग केली होती. तसेच काट्या आणि दगडांच्या साहाय्याने हल्ले केले होते. ही दंगल पेटल्यानंतर हे सर्व आरोपी मेवातच्या पर्वतीय भागात तसेच राजस्थानच्या जयपूर-उदयपूर आणि उत्तर प्रदेशात जावून लपून बसले होते.
नूहमध्ये दंगल झाल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण परिसरात निमलष्करी दलाच्या 20 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. रेवाडी, गुडगाव, पलवल, फरीदाबादसह पाच जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्याचबरोबर इंटरनेटही बंद करण्यात आले आहे.
ही बातमी वाचा: