एक्स्प्लोर
...म्हणून मुख्यमंत्र्यांसह अख्ख मंत्रिमंडळ सायकलवरून मंत्रालयात दाखल
चंदीगढ: हरियाणा विधानसभेच्या पवसाळी अधिवेशनाचा आज शेवट
चा दिवस होता. यावेळी
हरियाणा सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळच सायकलवरून मंत्रालयात दाखल झालं. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह सर्व कॅबिनेट मंत्री आणि भाजप आमदार सायकल आणि सायकल रिक्षाच्या आधारे विधानभवन परिसरात आले होते. पर्यावरण जागृतीसाठी मंत्रालयात येण्यासाठी सायकलचा वापर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदारांच्या वेतनवाढीचा निर्णयाचे बिल मंजूर करण्यात येणार होते. पहिला हे विधेयक मंगळवारी सादर करण्यात येणार होते. मात्र, सर्व आमदारांनी या विधेयकात काही सुधारणा सुचवल्याने हे विधेयक आज सादर करण्यात आले. पण मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व मंत्रिमंडळामध्ये सायकल रॅली संदर्भात कमालीचा उत्साह होता.
संसदीय सचिव श्याम सिंह राणा यांनी रिक्षातून प्रवास करून मंत्रालयात प्रवेश केला. तर मुख्यमंत्री खट्टर यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक सायकलवरून आले.
दरम्यान, काँग्रेसने खट्टर सरकारवर टीका करत, ही सायकल रिक्षा म्हणजे नाटक असल्याचे म्हणलं आहे. पण दुसरीकडे काँग्रेसचे आमदार शकुंतला खटक बुलेटवरून मंत्रालयात परिसरात दाखल झाल्या. त्यांनी मंत्रालयात परिसरात दाखल झाल्यानंतर अन्य एक आमदार गीता भुक्कल यांना पाठीमागे बसवून बुलेट सवारीचा आनंद लुटला.
मुख्यमंत्री निवास ते मंत्रालयात यातील अंतर दीड किलोमीटर असून सर्व मंत्री पहिल्यांदा आपल्या गाडीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर ते सायकलवरून विधानसभेत आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement