(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Harnaaz Sandhu : 'सुंदर चेहऱ्यामुळेच मिस यूनिवर्स'; लोकांच्या प्रतिक्रियांवर हरनाजचं सडेतोड उत्तर
Harnaaz Sandhu : हरनाजननं मिस यूनिवर्स स्पर्धेची तुलना ऑलिम्पिक स्पर्धेसोबत करून लोकांच्या प्रतिक्रियेवर सडेतोड उत्तर दिलं आहे.
Miss Universe 2021 Harnaaz Sandhu : चंदीगढ गर्ल हरनाज संधूनं (Harnaaz Sandhu) विश्वसुंदरीचा (Miss Universe 2021) किताब मिळवला आहे. 21 वर्षीय हरनाज संधूने नुकताच 'मिस दीवा मिस यूनिवर्स इंडिया 2021' किताब आपल्या नावे केला. त्यानंतर हरनाजने मिस युनिवर्स स्पर्धेची तयारी सुरु केली होती. यंदाचं विश्वसुंदरी स्पर्धेचं 70वं वर्ष आहे. हरनाज भारताची मान जागतिक स्पर्धेत उंचावत 'Miss Universer 2021' किताबाची मानकरी ठरली. काही दिवसांपूर्वी लोकांनी हरनाजला ती केवळ सुंदर चेहऱ्यामुळेच 'मिस यूनिवर्स' होऊ शकली, असं म्हणलं. लोकांच्या या मतावर हरनाजने सडेतोड उत्तर दिलं आहे.
हरनाजने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितले की, 'बऱ्याच लोकांचे असे मत आहे की मी माझ्या सुंदर चेहऱ्यामुळे मिस यूनिवर्स स्पर्धा जिंकू शकले. पण मला माहित आहे की मी किती कष्ट घेतले आहेत. त्या लोकांसोबत वाद घालण्यापेक्षा मी माझ्या कामातून त्यांना उत्तर देईन. मिस यूनिवर्स ही स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धेसारखी आहे. जेव्हा आपण एखाद्या खेळाडूचे खेळ जिंकल्यानंतर कौतुक करतो, तर मिस यूनिवर्ससारख्या सौंदर्य स्पर्धेतील विजेत्यांचे कौतुक आपण का करू शकत नाही? लोकांचे विचार बदलत आहेत. त्यामुळे मला याचा आनंद होत आहे की मी त्यांचे स्टिरियोटाइप विचार बदलत आहे.'
View this post on Instagram
तब्बल 21 वर्षांनंतर हरनाजने भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे. याआधी 2000 साली लारा दत्तानं विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला होता. हरनाजने ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात काम केल आहे.
इतर बातम्या :