Har Ghar Tiranga LIVE : 'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात, राज्यभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह; प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...
Har Ghar Tiranga Campaign LIVE : देशभरात आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. यासंबंधित प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...
LIVE

Background
CEO स्वामींनी महिला अधिकारी यांना दिला ध्वजारोहणाचा मान ..!
Solapur - जिल्हा परिषदेत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत हुतात्मा स्मृती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या मार्गावर महिलांची विशेष स्वदभावना रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये CEO दिलीप स्वामी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
बीड शहरातून खासदार प्रीतम मुंडेची भव्य तिरंगा रॅली, सलीम जहाँगीर यांनी बनवला 262 फुटांचा तिरंगा ध्वज
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज बीड शहरामध्ये भव्यदिव्य तिरंगा रॅली काढण्या आली होती. भाजपाचे सलीम जहाँगीर यांनी 262 फुटांचा तिरंगा ध्वज बनवला असून या रॅलीमध्ये खा. प्रितम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.. आज सकाळी 262 फुटाचे तिरंगा ध्वज घेऊन शहरातून रॅली काढण्यात आली.
धुळे: जमियत उलेमा हिंद संस्थेने काढली शहरातून तिरंगा रॅली
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' अभियानाच्या जनजागृतीसाठी धुळ्यातील जमीयत उलेमा हिंद यांच्यावतीने शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. आमदार फारुक शाह यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मुस्लिम समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या रॅलीमुळे शहर तिरंगामय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहराच्या विविध भागातून निघालेल्या या तिरंगा रॅलीचा देवपूर बस स्थानक येथे समारोप करण्यात आला. यावेळी मुस्लिम धर्मीय बांधवांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
विविध कलाकृती मधून विध्यार्थी यांनी साकारला तिरंगा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशभरात तिरंगा उपक्रमाचं आयोजन घाटकोपर येथील शिवाजी शिक्षण संस्था येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील 750 विद्यार्थ्यांनी भारतीय राष्ट्रधजावर आधारित विविध आकार शाळेच्या मैदानात साकारले. ज्यात सारेजहासें अच्छा व इतर स्वातंत्र्यावर आधारित गाण्याच्या तालावर नऊ फुट बाय 13.5 फूट आकाराचा झेंडा साकारुन त्यात विविध छटा सादर केल्या. तसेच विद्यार्थ्यांनी विशिष्ठ पद्धतीने उभे राहून अमृतमहोत्सवाचा 75 हा अंक साकारून त्या भोवती 75 तिरंगी ओढनी घेतलेल्या मुलींनी गोलाकार फिरून तिरंगाची प्रतिकृती साकारली. भारतातील महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, राजस्थान, काश्मिर, पंजाब, केरळा या सारख्या नऊ राज्यांच्या पारंपारिक गणवेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी तिरंगा हाती घेऊन संघराज्य एकीचे दर्शन घडविले तसेच शहीद भगतसिंह, राजगुरु, सुखदेव, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी इत्यादी व्यक्तीरेखा साकारुन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांना ध्वजवाटपही करण्यात आले.
परभणीत पोलिसांची तिरंगा रॅली
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याने देशभरात अमृत महोत्सव साजरा केला जातोय. समाजातील विविध घटकांनी यात आपला सहभाग नोंदवला आहे. आज परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. पोलीस मुख्यालयापासून निघालेल्या या रॅलीत सर्व अधिकारी, कर्मचारी हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. शिवाय पोलीस व्हॅन, दुचाकी वरील पोलीस ही शहर वासियांचे लक्ष वेधून घेत होतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
