(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Har Ghar Tiranga : आजपासून 'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात, 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा
Har Ghar Tiranga Campaign : यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त केंद्र सरकारकडून आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Har Ghar Tiranga Abhiyan : भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण (Independence Day) होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
देशभरात 75 व्या स्वातंत्र्यदिनाची (Independence Day) तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. यंदा 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' (Azadi ka Amrit Mahotsav) मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात
भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनूसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
तिरंगा कधी फडकवता येईल?
'हर घर तिरंगा' अभियानाचा देशभरात उत्साह आहे. यापूर्वी देशात तिरंगा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावण्याचा नियम होता. जुलै 2022 मध्ये सरकारनं या नियमात सुधारणा केली आणि त्यानंतर आता रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकवता येणार आहे.
पंतप्रधान मोदींनी केलं होतं आवाहन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्ऱधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' या अभियानाची घोषणा केली होती. यावेळी देशभरातील जनतेला त्यांच्या घरावर किंवा कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये तिरंगा विक्रीही करण्यात आली.
पोस्ट ऑफिसमधून असा खरेदी करा तिरंगा
पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर www.epostoffice.gov.in भेट देऊन तुम्ही घरबसल्या तिरंगा खरेदी करु शकता. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर होम पेजवर तिरंगा दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी लॉग ईन केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर तसेच किती संख्येने तिरंगा पाहिजेत याची नोंद करावी लागणार आहे. त्यानंतर ऑर्डर कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला पेमेंट प्रोसेस पूर्ण करावं लागेल. तुम्ही जर एकदा ऑर्डर केली तर तुम्हाला ती रद्द करता येणार नाही. पोस्टातून तिरंगा खरेदी करण्यासाठी तुम्हाला 25 रुपये खर्च करावे लागतील. पोस्ट ऑफिसने 1 ऑगस्टपासून तिरंगा विक्रीला सुरुवात केली आहे.