(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Happy Teachers Day : लहानपणापासूनच पुस्तकांची आवड, स्वामी विवेकानंद ज्यांचे आदर्श; जाणून घ्या डॉ. राधाकृष्णन यांच्याबद्दल पाच तथ्ये
Happy Teachers Day 2023: लहानपणापासूनच पुस्तकांची आवड असलेले राधाकृष्णन यांच्यावर स्वामी विवेकानंदांचा खूप प्रभाव होता. ते स्वामी विवेकानंदांना आपला आदर्श मानत.
Happy Teachers Day 2023 : दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी देशभरात शिक्षक दिन (Teachers Day 2023) मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांचा जन्म झाला. 1962 पासून त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो. लहानपणापासूनच पुस्तकांची आवड असलेले राधाकृष्णन यांच्यावर स्वामी विवेकानंदांचा खूप प्रभाव होता. ते स्वामी विवेकानंदांना आपला आदर्श मानत. तसेच देशात उत्तम विचारसरणीचेच शिक्षक व्हायला हवे, असे त्यांचे मत होते. डॉ. राधाकृष्णन शिक्षकांचा खूप आदर करत असे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्याशी निगडीत काही तथ्ये सांगणार आहोत जे कदाचित तुम्हाला माहित नसतील.
महान तत्वज्ञानी
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. ते तत्त्वज्ञानाचे (Philosophy) प्राध्यापकही होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. ते मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये आणि नंतर म्हैसूर विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. ते भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात महान तत्त्वज्ञ मानले जातात.
वयाच्या 16 व्या वर्षी लग्न
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी लग्न झाले. त्यांची पत्नी त्यावेळी त्यांच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होती आणि त्यांचे लग्न झाले तेव्हा ती फक्त 10 वर्षांची होती. त्यांच्या पत्नीचे नाव शिवकामू होते. लग्नानंतर पाच वर्षांनी त्यांच्या घरी मुलगी झाली.
देशाचे पहिले उपराष्ट्रपती
स्वातंत्र्यानंतर 1952 मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन देशाचे पहिले उपराष्ट्रपती झाले. उपराष्ट्रपती पदानंतर त्यांनी 1962 मध्ये देशाचे दुसरे राष्ट्रपती म्हणूनही काम पाहिले.
युनेस्कोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले
भारताच्या स्वातंत्र्यानंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 1949 ते 1952 या काळात युनेस्कोमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यावेळी ते सोव्हिएत युनियनमध्ये भारताचे राजदूतही होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ते संविधान सभेचे सदस्यही होते.
1954 मध्ये भारतरत्न प्रदान
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी 1954 मध्ये देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. भारतरत्न मिळाल्यानंतर ते देशाचे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती झाल्यानंतर ते मद्रासमध्ये राहू लागले.
दीर्घ आजाराने निधन
17 एप्रिल 1975 रोजी राधाकृष्णन यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात, त्यांना मार्च 1975 मध्ये अमेरिकन सरकारने टेम्पलटन पुरस्काराने सन्मानित केले.
ही बातमी वाचा: