Hanuman Jayanti 2023 : यंदाची हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि या दिनाचं महत्त्व
Hanuman Jayanti 2023 : हनुमानजींची जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी घरोघरी बजरंगबलीची पूजा केली जाते
Hanuman Jayanti 2023 : प्रभू रामचंद्रावर निस्सीम भक्ती करणाऱ्या हनुमंताचा जन्म महोत्सव म्हणजेच हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2023). भगवान हनुमानाची जयंती दरवर्षी चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. यावेळी 6 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. हनुमानजींची जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी घरोघरी बजरंगबलीची पूजा, विधी, सुंदरकांड पठण इ. केले जाते.
हनुमान जयंती 2023 पूजा शुभ मुहूर्त (Hanuman Jayanti Muhurtha)
सकाळी 06:06 AM ते 07:40 AM
सकाळी 10:49 AM ते 12:23 PM
दुपारी 12:23 PM ते 01:58 PM
दुपारी 01:58 PM ते 03:32 PM
संध्याकाळी 05:07 PM ते 06:41 PM
संध्याकाळी 06:41 PM ते 08:07 PM
हनुमान जयंती 2023 पूजा विधी (Hanuman Jayanti Puja Vidhi)
सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर हनुमानजींच्या समोर बसून त्यांचं ध्यान करा. आता आंब्याच्या पानाने हनुमानजींवर पाणी शिंपडा. हनुमानजींना शेंदूर अर्पण करा. शेंदूर लावल्यानंतर बजरंगबलीला लाल फुलं अर्पण करा. याशिवाय अक्षत, सुपारी, मोतीचूर लाडू, लाल लंगोट अर्पण करा. हनुमान चालिसाचं पठण करा. हनुमानजींना भोग म्हणून खीर अर्पण करा. या दिवशी सुंदरकांड आणि बजरंग बाण अवश्य वाचा. हनुमान मंत्रांचा जप करा आणि हनुमानजींची आरती करा. आता हनुमानजींच्या भोग प्रसादाचं सगळ्यांना वाट करा.
हनुमान जयंती 2023 चं महत्व (Importance of Hanuman Jayanti)
राम भक्तांसाठी हनुमान जयंतीचा दिवस खूप खास असतो. श्री रामाचा भक्त हनुमानजींच्या जयंतीला विधीवत पूजा केली जाते. शहरात, गावांत मोठ मोठ्या मिरवणुका काढल्या जातात. धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजी हे आपल्या भक्तांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर करतात असा विश्वास आहे. म्हणून हनुमानजींना संकटमोचन म्हटलं जातं.
असं म्हणतात की, जो भक्त हनुमानजीची उपासना करतात ते भय, क्रोध, दु:ख, दोष मुक्त होतो. हनुमानजींची खऱ्या मनाने पूजा केली की आपल्याला दुहेरी म्हणजे रामाची आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते. एक अशी ही मान्यता आहे, म्हणजे शिवपुराणात असं म्हटलं आहे की, संकटमोचन हे भगवान शंकराचा 11वा अवतार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या :