ज्ञानवापी प्रकरणी आज वाराणसी जिल्हा न्यायालयात सुनावणी; शृंगार गौरीच्या पूजेच्या मागणीची याचिका
Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी प्रकरणी आज वाराणसी जिल्हा न्यायालयात सुनावणी; शृंगार गौरीच्या पूजेच्या मागणीची याचिकेवर आजा सुनावणी पार पडणार आहे. हे प्रकरण न्यायालयात चालवण्यासारखं आहे की, नाही याची सुनावणी केली जाणार आहे.
Gyanvapi Masjid Case : वाराणसी जिल्हा न्यायालयात आजपासून ज्ञानवापी (Gyanvapi Masjid Case) प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर या प्रकरणी आजपासून पुन्हा सुनावणीला सुरुवात होणार आहे. वाराणसी जिल्हा सत्र न्यायालयात (Varanasi Session Court) शृंगार गौरीची नियमित पूजा करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी 30 मे रोजी मुस्लीम पक्षाच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आला होता. युक्तिवादादरम्यान खटला फेटाळण्याची मागणी करण्यात आली होती. आज, सर्वात आधी मुस्लिम बाजू आपली उलटतपासणी पूर्ण करेल, त्यानंतर हिंदू पक्षाच्या वतीनं युक्तिवाद केला जाईल. दुपारी दोनच्या सुमारास ही सुनावणी सुरू होईल.
वाराणसीतील विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह बिसेन म्हणाले याप्रकरणावर बोलताना म्हणाले की, "4 जुलै रोजी, जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात, ज्ञानवापी प्रकरणात राखी सिंह विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या खटल्याची सुनावणी 7//11 रोजी होणार आहे. या खटल्याच्या याचिकेत दररोज शृंगार गौरीचं दर्शन घेण्याची मागणी करण्यात आली आहे. ही याचिका 18 ऑगस्ट 2021 रोजी न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी 30 मे रोजी शेवटची सुनावणी पार पडली होती. त्यातही मुस्लिम बाजूचा युक्तीवाद बाकी होता, एक-दोन दिवसांत मुस्लिम पक्षाच्या वतीनं युक्तीवाद केला जाईल. त्यांच्या युक्तीवादानंतर आमच्या वतीनं युक्तीवाद केला जाईल."
वाराणसी जिल्हा न्यायालय या प्रकरणाच्या मेंटेनबिलिटीची म्हणजेच, हे प्रकरण न्यायालयात चालवण्यासारखं आहे की, नाही याची सुनावणी केली जाणार आहे. हे तेच प्रकरण आहे, ज्यावर दिवाणी न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी 26 एप्रिल रोजी ज्ञानवापी कॅम्पसचं व्हिडीओग्राफी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या पाहणीचा अहवाल 19 मे रोजी न्यायालयात सादर करण्यात आला होता.
सर्वेक्षणादरम्यान, हिंदू पक्षानं ज्ञानवापी मशिदीच्या वाजू खान्यात शिवलिंग सापडल्याचा दावा केला होता. ज्याला मुस्लीम पक्षानं नाकारलं आणि ते शिवलिंग नसून कारंजं असल्याचं सांगितलं. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं मुस्लिम पक्षाच्या याचिकेवर हे प्रकरण जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारसाठी आज कसोटीचा दिवस; बहुमत चाचणी होणार, काय असेल रणनीती?