एक्स्प्लोर

Guru Nanak Jayanti 2022 Holiday: उद्या काही शहातील बँका राहणार बंद, तुमच्या शहरात सुरू राहणार?

गुरु नानक जयंतीनिमित्त (Guru Nanak Jayanti 2022) काही बँका बंद असणार आहेत तर काही  बँकांना सुट्टी नसणार आहे. कोणत्या शहरांमधील बँका बंद असतील, जाणून घेऊयात....

Guru Nanak Jayanti 2022 Holiday: उद्या (8नोव्हेंबर) जगभारात गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti 2022) साजरी केली जाणार आहे. गुरु नानक (Guru Nanak) हे शीख धर्माचे (Sikh) संस्थापक आणि पहिले शीख गुरु होते. 1469 साली कार्तिक पौर्णिमेच्या (Kartik Pournima) दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यामुळे दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला गुरु नानक जयंती जगभरात साजरी केली जाते. गुरु नानक जयंतीनिमित्त काही बँका बंद (Bank Holiday) असणार आहेत तर काही बँकांना सुट्टी नसणार आहे. कोणत्या शहरांमधील बँका बंद असतील, जाणून घेऊयात...

'या' शहरांमधील बँकांना सुट्टी
आयझॉल, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगर येथील बँका गुरु नानक जयंती दिवशी बंद राहतील. आगरतळा, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, कोची, पणजी, पाटणा, शिलाँग आणि तिरुअनंतपुरम या शहरांमधील बँका सुरू राहतील.

या राज्यांच्या बँकांना सुट्टी नाही
त्रिपुरा,गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, सिक्कीम, आसाम, मणिपूर, केरळ, गोवा, बिहार आणि मेघालय या राज्यांमधील बँकांना गुरु नानक जयंती दिवशी सुट्टी नसणार आहे. 

गुरुनानक जयंती व्यतिरिक्त या आठवड्यात 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी बँका बंद राहतील. कारण 12 नोव्हेंबर रोजी महिन्याचा दुसरा शनिवार आहे आणि 13 नोव्हेंबरला रविवार आहे. बंगळुरू, शिलाँगमधील बँका 11 नोव्हेंबर रोजी कनकदास जयंती/वंगाळा सणाच्या निमित्ताने बंद राहतील. आठ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती व्यतिरिक्त कार्तिक पौर्णिमा, रहस पौर्णिमा, वंगळा उत्सव हे सण देखील साजरे केले जाणार आहेत. तर या दिवशी  वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022) देखील असणार आहे. 

शीख धर्माच्या अनुयायांसाठी गुरु नानक जयंती खास असते. या उत्सवाला प्रकाश उत्सव किंवा गुरु पर्व असेही म्हणतात. गुरुनानक जयंती उत्सव  पौर्णिमेच्या दोन दिवस आधी सुरू होतो. त्यात अखंडपाठ, नगर कीर्तन यांसारख्या विधींचा समावेश आहे. गुरु नानक जयंतीच्या दिवशी देशभरातील गुरुद्वारा फुलांनी सजवले जातात, ज्याला मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Bank Holidays in November 2022 : नोव्हेंबर महिन्यात 10 दिवस बँका राहणार बंद! 'ही' आहे सुट्ट्यांची यादी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget