एक्स्प्लोर

Gujrat Election: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; 93 जागांवर आठशेच्यावर उमेदवार रिंगणात

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात जवळपास 61 राजकीय पक्षांचे 833 उमेदवार नशीब अजमावत आहेत. पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. 

Gujrat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज 5 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर हे मतदान होत आहे.  दुसऱ्या टप्प्यात आज 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदेपूर या जिल्ह्यातील हे 93 मतदारसंघ आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेते आज मतदान करणार आहेत.

या 93 विधानसभा मतदारसंघांमध्ये 2.54 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. 26,409 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून सुमारे 36,000 ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जवळपास 61 राजकीय पक्षांचे 833 उमेदवार नशीब अजमावत आहेत. यामध्ये 285 अपक्षांचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. 

या टप्प्यात भाजप सर्व 93 जागांवर निवडणूक लढवत आहे. शिवाय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सर्व 93 जागांवर लढत आहेत. काँग्रेस 90 जागांवर निवडणूक लढवत असून त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भारतीय आदिवासी पक्षाने (BTP) 12 उमेदवार उभे केले आहेत आणि बहुजन समाज पक्षाने (BSP) 44 उमेदवार उभे केले आहेत. 

दुसऱ्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा घाटलोडिया, भाजप नेते हार्दिक पटेल यांचा विरमगाम तसेच गांधीनगर दक्षिणचा समावेश असून जिथून भाजपचे अल्पेश ठाकोर निवडणूक लढवत आहेत.  जिग्नेश मेवाणी हे बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुखराम राठवा हे छोटा उदयपूर जिल्ह्यातील जेतपूरमधून उमेदवार आहेत. 

भाजपचे बंडखोर मधु श्रीवास्तव हे वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने या 93 पैकी 51 जागा जिंकल्या होत्या. यात काँग्रेसनं 39, तर अपक्ष उमेदवारांनी तीन जागा जिंकल्या. मध्य गुजरातमध्ये भाजपने 37 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला 22 जागा मिळाल्या.  

सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात सरासरी 63.31 टक्के मतदान झाले. दोन टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे.

ही बातमी देखील वाचा

Gujarat: गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 63.31  टक्के मतदान, 788 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?

व्हिडीओ

Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Embed widget