एक्स्प्लोर

गुजरातमध्ये भाजपचा 22 आमदारांना फोडण्याचा डाव होता : काँग्रेस

गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र त्यापूर्वीच काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांच्यावर पराभवाचं सावट आहे.

बंगळुरु : गुजरातमध्ये पक्षाला खिंडार पडण्यापासून वाचण्यासाठी काँग्रेसने 42 आमदारांना बंगळुरुच्या रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवलं आहे. हे सर्व आमदार आज पहिल्यांदा माध्यमांसमोर आले आणि भाजपवर जोरदार टीका केली. गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र त्यापूर्वीच काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांच्यावर पराभवाचं सावट आहे. त्यापासून वाचण्यासाठी काँग्रेसने आमदारांना बंगळुरुमध्ये नेऊन ठेवलं आहे. भाजपकडून साम-दाम-दंड-भेदचा वापर : काँग्रेस काँग्रेस नेते शक्ती सिंह गोहिल यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपकडून साम-दाम-दंड आणि भेद ही पद्धत अवलंबली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. राजकारणात विरोधकांना कमजोर करण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जातात, मात्र भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. काँग्रेसच्या 22 आमदारांना पैसे देऊन राजीनामा द्यायला लावण्याचा भाजपचा डाव होता. आमदारांना 15-15 कोटी रुपयांचं आमिष दाखवण्यात आलं, असा आरोप गोहिल यांनी केला. दरम्यान राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसकडे आवश्यक मतं आहेत, असा दावाही गोहिल यांनी केला. काँग्रेसचे 57 आमदार आहेत. एनसीपीसोबत काँग्रेसची युती आहे. ज्यांचे दोन आमदार आहेत. तर जेडीयूच्या एका आमदाराचाही काँग्रेसला पाठिंबा असून एकूण 60 आमदारांचा पाठिंबा आहे आणि जिंकण्यासाठी 45 आमदारांची गरज आहे, असा दावा गोहिल यांनी केला. गुजरातमध्ये पूरपरिस्थितीमुळे जीव जात असलेल्या लोकांची चिंता भाजपला नाही, तर काँग्रेसचे आमदार फोडण्याच्या तयारीत भाजप आहे, असा आरोप गोहिल यांनी केला. काँग्रेसचे आमदार पैशांनी विकणारे नाहीत. त्यामुळे एकत्र राहून विश्वास एकवटता येईल, या उद्देशाने आमदारांनीच बंगळुरुला येण्याचा निर्णय घेतला, असंही गोहिल यांनी सांगितलं. तर आमदारांचे मोबाईल जप्त केल्याचं वृत्त खोटं असल्याचंही ते म्हणाले. गुजरातमध्ये काँग्रेसवर राजकीय संकट गुजरातमध्ये काँग्रेसच्या 57 आमदारांपैकी 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर पक्षाचे वरिष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे. उर्वरित आमदारांपैकी काही आमदार वाघेला गटाचे आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीपूर्वी आमदार फुटू नयेत, यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. 42 आमदारांना भाजपच्या भीतीने बंगळुरुला हलवण्यात आलं असून एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. राज्यसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा पराभव टाळण्यासाठी काँग्रेसला मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. काँग्रेसचे आणखी काही आमदार फुटणार? काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आता केवळ 51 आमदार उरले आहेत. त्यापैकी किती आमदार पक्षासोबत राहतील, याबाबत मोठी शंका आहे. कारण पक्षाला सध्या 44 आमदारांचाच पाठिंबा असल्याचं काँग्रेस नेते भरत सिंह सोलंकी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेसचे आणखी काही आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देतील, असा अंदाज लावला जात आहे. संबंधित बातम्या :

पुरामुळे गुजरातचं जनजीवन विस्कळीत, मात्र काँग्रेसचे 42 आमदार बंगळुरुत

गुजरातमध्ये काँग्रेसला खिंडार, दोन दिवसांत 6 आमदारांचा राजीनामा

काँग्रेसच्या चाणक्याला हरवण्यासाठी भाजपचा सापळा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
×
Embed widget