एक्स्प्लोर

राज्यसभेच्या 9 जागांसाठी मतदान, गुजरातमध्ये काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान होईल. तर 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि संध्याकाळी सात वाजता निकाल जाहीर करण्यात येईल.

अहमदाबाद : गुजरात राज्यसभेच्या 3 जागांसाठी तर पश्चिम बंगालच्या 6 जागांसाठी आज (मंगळवार) मतदान होणार आहे. सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान होईल. तर 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि संध्याकाळी सात वाजता निकाल जाहीर करण्यात येईल. सर्व 9 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 18 ऑगस्टला संपणार आहे. यामध्ये गुजरातच्या लढतीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. अहमद पटेल यांची परीक्षा बंडाच्या भीतीपोटी बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलेले काँग्रेसचे गुजरातमधले 44 आमदार पुन्हा गुजरातमध्ये परतले आहेत. या आमदारांना सध्या एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत आमदारांनी दगाफटका करू नये म्हणून काँग्रेसचा खटाटोप सुरू आहे. पक्षाचे चाणक्य अशी ओळख असलेले अहमद पटेल यांना कोणत्याही परिस्थिती राज्यसभेवर पाठवण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे. मात्र मध्यंतरी काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपच्या तंबूत प्रवेश केला. यापुढे कोणताही आमदार फुटू नये म्हणून  आमदारांवर पक्षाची करडी नजर असणार आहे. गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीचं गणित गुजरातमध्ये होत असलेल्या राज्यसभेच्या 3 जागांसाठी भाजपकडून भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेस सोडून आलेले बलवंत सिंह निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर काँग्रेसकडून अहमद पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधील आमदारांचं गणित गुजरात विधानसभेत एकूण 182 आमदार आहेत. काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आता केवळ 176 आमदार उरले आहेत. मात्र भाजपने इतर आमदारांच्या पाठिंब्याने बलवंत सिंह यांच्या विजयाचा दावा केला आहे. काँग्रेसकडे सध्या असलेल्या 51 आमदारांच्या पाठिंब्यावर अहमद पटेल यांचा विजय निश्चित पाहिजे, मात्र काँग्रेसच्या गोटात सध्या अस्वस्थता आहे. कारण बंगळुरुमध्ये ठेवलेल्या 44 आमदारांचाच पक्षाला पाठिंबा असल्याची माहिती आहे. वाघेला गटाच्या आमदारांचं समर्थन कुणाला? गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी नुकताच पक्षाला रामराम ठोकला आहे. सध्या काँग्रेसमध्ये वाघेला गटाचे अनेक आमदार आहेत. मात्र हे आमदार कुणाला मतदान करणार याबाबत मोठा सस्पेंस आहे. हे आमदार अहमद पटेल यांनाच मतदान करतील, असा दावा काँग्रेसने केला आहे. वाघेला यांनी याबाबत अजून काहीही भाष्य केलेलं नाही. हे आमदार एकतर भाजपला पाठिंबा देऊ शकतात किंवा 'नोटा'चा पर्याय निवडू शकतात, असा अंदाज लावला जात आहे. मात्र बलवंत सिंह यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे आणि काँग्रेस नेतृत्वावर नाराजी असल्यामुळे वाघेला गटाचे आमदार बलवंत सिंह यांनाच मतदान करतील, असंही बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार भाजपला पाठिंबा देणार काँग्रेसचे गुजरातमधील सहा आमदार भाजपने फोडल्यानंतर अहमद पटेल यांची सारी भिस्त राष्ट्रवादी काँग्रेसवर होती. मात्र, ऐनवेळी भूमिका बदलून राष्ट्रवादीने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्यानं पटेलांची वाट आणखी बिकट झाली आहे. राष्ट्रवादीचे गुजरातमध्ये दोन आमदार आहेत. आज संध्याकाळी उशीरापर्यंत राष्ट्रवादीने याबाबत कोणताही व्हीप जारी केला नव्हता. पण मतदानासाठी अवघे काही तास उरलेले असताना राष्ट्रवादीनं काँग्रेसला मोठा धक्का दिला. भाजपकडून अमित शहा, स्मृती इराणी यांचा विजय पक्का आहे. पण काँग्रेसचे फुटीर आमदार बलवंतसिंह राजपूत यांच्या रुपाने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून भाजपनं अहमद पटेलांची पुरती नाकाबंदी केली आहे. भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराकडे केवळ 31 मतं भाजपचे बलवंत सिंह हे पक्षाचे तिसरे उमेदवार आहेत. आकडेवारीनुसार त्यांच्याकडे केवळ 31 मतं आहेत. मात्र बाहेरच्या आमदारांच्या पाठिंब्याने भाजपने बलवंत सिंह यांच्या विजयाचा दावा केला आहे. गुजरातमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूचा एक आमदार आहे. सद्यपरिस्थिती पाहता जेडीयूचा आमदारही भाजपला पाठिंबा देईल, असं बोललं जात आहे. मात्र गुजरातमधील जेडीयू आमदार शरद यादव गटाचा आहे. त्यामुळे त्याचा पाठिंबा अहमद पटेल यांना असेल, असाही दुसरा अंदाज लावला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget