(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुजरातमध्ये खाजगी बसचा भीषण अपघात, अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
अपघातात वऱ्हाडी आणि टोलनाक्यावरील तीन कामगारांसह 15 जण जखमी झाले असून त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
गुजरात : गुजरातमधील तापी जिल्ह्यातील सोनगढ येथील मंडल टोल नाक्यावर गुरुवारी सकाळी मोठा अपघात झाला. येथे लग्नतील वऱ्हाडींनी भरलेली बस थेट टोलनाक्यामध्ये घुसली. या अपघातात वऱ्हाडी आणि टोलनाक्यावरील तीन कामगारांसह 15 जण जखमी झाले असून त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्वांना सोनगड येथील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात टोलनाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
महाराष्ट्रातून बस येत होती
सोनगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वऱ्हाडींनी भरलेली ही बस बुरहानपूर (महाराष्ट्र) येथून सुरतकडे परतत होती. बसमध्ये सुमारे 40 लोक होते. दरम्यान, सकाळी अकराच्या सुमारास चालकाचे स्टेअरिंगवर ताबा न राहिल्याने भरधाव वेगात बस टोल चेकचा ब्रेकर ओलांडून थेट केबिनमध्ये घुसली. त्यामुळे केबिनमध्ये बसलेली महिला कॅशिअरही अपघाताची शिकार झाली. त्याचवेळी केबिनजवळ उभी असलेली एक महिला आणि एक पुरुष कर्मचारीही जखमी झाला.
ड्रायव्हर-कंडक्टरसह समोर बसलेले दोघेजण गंभीर
या अपघातात चालक-कंडक्टरसह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. चौघांना तापी जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे. त्याचवेळी बसच्या धडकेने टोलनाक्याची केबिन पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, तेथे ठेवलेल्या मशिन्सचेही नुकसान झाले आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्यात आले. अपघातानंतर टोलनाक्यावर बराच वेळ जाम झाला होता.
कॅशिअरचा पाय फ्रॅक्चर
बस केबिनच्या दिशेने येताना पाहून केबिनमध्ये बसलेली महिला कर्मचाऱ्याने उठून धाव घेतल्याने तिचा जीव वाचला. मात्र पाय फ्रॅक्चर झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. केबिनच्या मागे दोन कर्मचारी उभे होते, तेही अपघाताचा शिकार झाले. मात्र, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.