एक्स्प्लोर

Video : मुलांच्या अंगावर कोसळली शाळेची भिंत, मन हेलावून टाकणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद!

गुजरात राज्यातील वडोदरा येथे एका शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. या शाळेची भितं कोसळली असून या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मुंबई : सध्या देशभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय. पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना झाल्याचे वृत्त येत आहे. काही ठिकाणी इमारत कोसळते आहे.  तर काही ठिकाणी दरड कोसळ्याच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी बेदरकापणे वाहने चालवल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. असे असतानाच गुजरात राज्यातील वडोदरा येथे वेगळाच प्रसंग समोर आला आहे. येथे मुलं वर्गात बसलेली असताना त्या वर्गाची भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत एक मुलगा जखमी झालेला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

मिळालेल्या माहितीनुसार 19 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. गुजरात राज्यातील वडोदरा येथील श्री नारायण गुरुकूल स्कूल या शेळात ही दुर्घटना घडली. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान ही घटना घडली. 

शाळेच्या मुख्याध्यापिकांनी काय सांगितले?

शाळेच्या मुख्याध्यापिका रुपल शाह यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. "आम्ही अचानकपणे मोठा आवाज ऐकला. त्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत एका मुलाच्या डोक्याला मार लागला आहे. या घटनेनंतर आम्ही इतर विद्यार्थ्यांना सुरक्षित ठाकणी नेलं," असं रुपल शाह यांनी सांगितलं. 

दुर्घटनेत सायकल्सची मोडतोड

या दुर्घटनेत शाळेच्या वर्गाची एक भितं कोसळली. ही भिंत कोसळून बाजूच्या मोकळ्या मैदानात पडली. भिंतीच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात विद्यार्थ्यांच्या सायकल ठेवल्या जायच्या. या दुर्घटनेत काही सायकल्सची मोडतोड झाली आहे. 

पाहा घटनेचा थरारक व्हिडीओ :

एक विद्यार्थी जखमी

ही दुर्घटना घडल्यानंतर वडोदरा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाने बचावमोहीम राबवली. जखमी झालेला विद्यार्थी हा इयत्ता सातवी आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती बरी आहे. 

अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव

दुर्दैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सविस्तर विचारलं. आम्हाला बचावासाठी कॉल आल्यानंतर आम्ही लगेच घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत एक विद्यार्थी जखमी झाला आहे. तसेच 10 ते 12 सायकल्सची मोडतोड झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

हेही वाचा :

मोठी दुर्घटना! मुंबईतील ग्रँट रोड परिसरात इमारत कोसळली, एका महिलेचा मृत्यू, तर 3 जण जखमी

"असली फालतू बडबड करायला मी मोकळा नाही", प्रश्नाचं उत्तर देताना अजित पवार भडकले; नेमकं काय घडलं?

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget