एक्स्प्लोर

दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या धर्तीवर उभं राहिलं नवं गुजरात सदन

महाराष्ट्र सदनाप्रमाणेच याही इमारतीला ऐतिहासिक लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'गर्वी गुजरात भवन' असं या नव्या सदनाचं नामकरण होणार आहे.

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये राज्यांची जी सदनं आहेत, त्यात सर्वात देखणी आणि आकर्षक इमारत म्हणून महाराष्ट्र सदनाचा उल्लेख होत असताना, या स्पर्धेत आता गुजरातनेही उडी घेतली आहे. दिल्लीतल्या अकबर रोडवर अवघ्या दीड वर्षात गुजरात भवनची आकर्षक वास्तू उभारण्यात आली आहे. 2 सप्टेंबरला, गणेशोत्सवाच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी या इमारतीचं उद्घाटन करणार आहेत. 132 कोटी रुपये खर्चून ही इमारत एनबीसीसी या कंपनीने बांधली आहे. विशेष म्हणजे दिल्लीत ज्या ठिकाणी काँग्रेसचं मुख्यालय आहे, त्याच्या अगदी समोरच मोदी-शाहांच्या या गुजरात भवनची वास्तू उभी करण्यात आहे. एकूण 20 हजार 325 चौरस मीटर अंतरावर हे सहा मजली सदन उभारण्यात आलं आहे. दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या धर्तीवर उभं राहिलं नवं गुजरात सदन महाराष्ट्र सदनाप्रमाणेच याही इमारतीला ऐतिहासिक लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'गर्वी गुजरात भवन' असं या नव्या सदनाचं नामकरण होणार आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांसाठी स्वतंत्र आलिशान कक्ष, मंत्र्यांसाठीचे 19 आलिशान कक्ष असं मिळून यात दीडशेपेक्षा अधिक निवासी कक्ष आहेत. दोन अंडरग्राऊंड पार्किंग्जही या इमारतीच्या खालच्या भागात असणार आहेत. शिवाय आधुनिक सेवांनी युक्त असे मल्टीपर्पज हॉल, मीडिया रुम, टेरेस गार्डन पब्लिक डायनिंग हॉल यात उभारण्यात आले आहेत. दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या धर्तीवर उभं राहिलं नवं गुजरात सदन दिल्लीत उत्तम चवीसाठी ओळखलं जाणारं जुन्या गुजरात सदनातील कॅन्टीन आता या नव्या सदनात स्थलांतरित होणार असंही समजतं आहे. इंडिया गेटच्या अगदी जवळच ही नवी इमारत असल्याने उत्कृष्ट शाकाहारी जेवणासाठी अनेक खवय्यांची पावलं इकडे वळणार यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
Embed widget