एक्स्प्लोर

Gujarat Next CM: गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार भूपेंद्र पटेल; भाजपच्या गटनेतेपदी निवड

Bhupendra Patel: गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भुपेंद्र पटेल हे शपथ घेणार आहेत. भाजप गुजरातच्या विधीमंडळाच्या बैठकीत एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Gujarat Next CM:  गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत (Gujarat Assembly Election) ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आज भाजप आमदारांची बैठक पार पडली. भाजप आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजप आमदार कनू देसाई यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. त्याला उपस्थित आमदारांनी एकमताने मंजुरी दिली. 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षेत भाजप विधीमंडळ गटाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कर्नाटकचे  माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर एकमताने सहमती दर्शवण्यात आली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर भूपेंद्र पटेल आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यासह दिल्लीत होणार आहेत. पंतप्रधान मोदी,  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि बी. एल. संतोष यांची भेट घेऊन त्यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करणार आहेत. त्याशिवाय, गुजरातच्या मंत्रिमंडळाबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व नव्या मंत्रिमंडळातील नावांवर शिक्कामोर्तब करणार आहे. 

शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती

भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी सोहळा 12 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संसदीय मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. 

भूपेंद्र पटेल हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत 20 जण कॅबिनेट मंत्री म्हणूनदेखील शपथ घेण्याची शक्यता आहे. 

भाजपचा ऐतिहासिक विजय 

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. यंदाच्या निवडणुकीत भाजपने 157 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपच्या या विजयाने काँग्रेसचा 37 वर्ष जुना विक्रमदेखील मोडीत निघाला. काँग्रेसने 1985 च्या निवडणुकीत 149 जागांवर विजय मिळवला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget