एक्स्प्लोर
गुजरात निवडणुकीत 'नोटा'चे आश्चर्यकारक आकडे!
एकूण 182 जागांसाठी गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान झालं होतं, तर दुसऱ्या टप्प्यात 68.70 टक्के मतदान झालं होतं.
गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सर्व 182 जागांचे कल हाती आले आहेत. काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर असताना, प्रत्येक पक्षासाठी एक-एक मत बहुमूल्य ठरत आहे.
नोटाचा पर्याय निवडला!
मात्र नोटाच्या आकड्यांवर नजर टाकली तर 1.8 टक्के म्हणजेच सुमारे सव्वा पाच लाख मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला मत दिलं नाही. 5,24,709 मतदारांनी भाजप किंवा काँग्रेस उमेदवारांना मत न देता NOTA चं बटण दाबलं, जो एक मोठा आकडा आहे.
गुजरात निकालानंतर किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका
कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान?
दुसरीकडे भाजपला गुजरातमध्ये 48.9 टक्के मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसला 42 टक्के नागरिकांचं समर्थन मिळालं आहे. 34,50,761 मतदारांनी भाजपला मत दिलं असून काँग्रेसच्या बाजूने 29,68,152 नागरिकांनी मतदान केलं. तर अपक्ष 4 टक्के, बसपा 0.7 टक्के, राष्ट्रवादीच्या 0.7 टक्के मतं मिळाली आहेत.
दुपारी दीड वाजेपर्यंत भाजप 104, काँग्रेस 75 आणि इतर 3 जागांवर आघाडी होते.
गुजरातचा निकाल, कोण - काय म्हणालं?
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील भाजप-काँग्रेसच्या जागा
आज सकाळी आठ वाजता गुजरात निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण 182 जागांसाठी गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान झालं होतं, तर दुसऱ्या टप्प्यात 68.70 टक्के मतदान झालं होतं.
पहिल्या टप्प्यातील 89 जागांपैकी 48 जागा मिळाल्या. तर काँग्रेस 41 जागांवर यश मिळालं. दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांपैकी भाजपला तब्बल 61 जागा मिळवता आल्या. मात्र काँग्रेसला अवघ्या 30 जागाच मिळवल्या.
संबंधित बातम्या
गुजरात विधानसभा निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATE
LIVE हिमाचल प्रदेश निवडणूक 2017 निकाल: भाजप बहुमताकडे
LIVE UPDATE : हार्दिकच्या सौराष्ट्र कच्छमध्ये काँग्रेसची मुसंडी
LIVE UPDATE : उत्तर गुजरातमध्ये भाजपचं निर्विवाद वर्चस्व
LIVE UPDATE दक्षिण गुजरातमध्ये भाजपची बाजी
LIVE UPDATE मध्य गुजरातमध्ये कमळ फुलण्याची चिन्हं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement