एक्स्प्लोर

सुरतमध्ये मराठमोळ्या संगीता पाटील यांची बाजी

संगीता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना झांशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पेहराव करुन घोड्यावरुन मिरवणूक काढली होती.

गांधीनगर : गुजरातमधील विधानसभा निवडणुकांमध्ये लिंबायत मतदारसंघातून मराठमोळ्या महिलेने विजय मिळवला आहे. भाजपच्या उमेदवार संगीता राजेंद्रभाई पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली. काँग्रेसच्या रविंद्र सुकलाल पाटील यांचा संगीता पाटील यांनी तब्बल 31 हजार 951 मतांनी पराभव केला. संगीता पाटील सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्या आहेत. संगीता पाटील या धुळ्यातील शिरपूर तालुक्यातल्या अर्थे गावातल्या माहिरवाशीण आहेत. खानदेशकन्येने मिळवलेल्या घवघवीत यशामुळे महाराष्ट्राची मानही अभिमानाने उंचावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. संगीता पाटील यांना 93 हजार 585 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या रविंद्र पाटलांना 61 हजार 634 प्राप्त झाली. राष्ट्रवादीचे अक्रम अन्सारी तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर शिवसेनेच्या सम्राट पाटील यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यांना अवघी 4 हजार 75 मतं मिळाली. गेल्या वेळीही काँग्रेस उमेदवार सुरेश मोहन यांचा संगीता पाटील यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. 2008 मध्ये पुनर्निर्मितीनंतर लिंबायत हा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यामुळे 2012 मध्ये पहिल्यांदाच इथे निवडणूक झाली होती. मराठी आणि मुस्लिम बहुल भाग असल्यामुळे भाजपने संगीता पाटील यांना उमेदवारी दिली होती. सुरतमध्ये मराठमोळ्या संगीता पाटील यांची बाजी संगीता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना झांशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पेहराव करुन घोड्यावरुन मिरवणूक काढली होती. त्यामुळे आचारसंहिता भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला, मात्र निवडणुकीत प्राण्यांचा वापर होत असल्याचं सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिलासा दिला. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी वर्ग भाजपवर नाराज आहे. निवडणुकीत भाजपला या नाराजीचा फटका बसल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र इथेच 16 पैकी 14 जागा मिळवत भाजपने धक्का दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Yusuf Pathan NCPI: 'आम्ही भाजप किंवा NDAचा भाग नाही', युसूफ पठाणसह NCP च्या तीन खासदारांची एनडीएच्या बैठकीकडे पाठ; एनसीपीच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
'आम्ही भाजप किंवा NDAचा भाग नाही', युसूफ पठाणसह NCP च्या तीन खासदारांची एनडीएच्या बैठकीकडे पाठ; एनसीपीच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Embed widget