एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सत्तेसाठी काँग्रेस हाफिज सईदलाही पक्षात घेतील : नितीन पटेल
"सत्तेसाठी काँग्रेस हाफिज सईदलाही पक्षात घेतील," असं वक्तव्य गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केलं आहे.
गांधीनगर : गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. सत्तेसाठी प्रत्येक दलांकडून अनेक वक्तव्य सुरु आहेत. याच मालिकेत गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या एका वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
"सत्तेसाठी काँग्रेस हाफिज सईदलाही पक्षात घेतील," असं वक्तव्य गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केलं आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपच्या दोन नेत्यांनी पक्षाला रामराम करुन, काँग्रेसला पाठिंबा दिला. त्या पार्श्वभूमीवर नितीन पटेल यांचं हे वक्तव्य आलं आहे.
रविवारी नरेंद्र पटेल यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. तर सोमवारी निखिल सवानी यांनी भाजपला रामराम करुन पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं.
भाजपची गोची
निखिल आणि नरेंद्र हे दोघेही गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलचे सहकारी आहेत. हार्दिक पटेलने यापूर्वीच भाजपचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. त्यातच नरेंद्र पटेल आणि निखिल सवानी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देताना, भाजपवर खरेदीचा आरोप केला आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच गोची होत आहे.
कोण आहे नितीन पटेल?
नितीन पटेल उत्तर गुजरातमधील पाटीदारांचा चेहरा आहेत. भाजपमध्येही त्यांची मोठी लोकप्रियता आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय मानले जातात. नितीन पटेल यांनी 1990 मध्ये आमदारकीद्वारे राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून सलग पाचवेळा त्यांनी विधानसभेवर निवडून जाण्याचा विक्रम केला. 1995 ते 2002 पर्यंत ते राज्य सरकारमध्ये मंत्री होते. पण 2002 मधील निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण 2007 च्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा विजयी होऊन विधानसभेत गेले. त्यानंतर सातत्याने ते गुजरात मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळत आहेत.
गुजरातच्या राजकारणात ट्विस्ट
दरम्यान, गेल्या काही दिवसात गुजरातच्या राजकारणात अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. कॅशकांड, आणि त्यानंतर गांधीनगरमध्ये ओबीसी नेता अल्पेश ठाकोरचा काँग्रेसमध्ये प्रवेश, यामुळे भाजपसाठी विधानसभा निवडणुकीची वाट बिकट होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
गुजरातमधील पटेल समाज किंगमेकर
गुजरातमध्ये पाटीदार समाजाची लोकसंख्या जवळपास 15 टक्के आहे. तर राज्यातील जवळपास 80 टक्के जागांवर पटेल समाजाचा प्रभाव आहे. गुजरातमध्ये पटेल समुदाय भाजपची वोटबँक मानलं जातं. कारण, भाजपच्या 182 पैकी 44 आमदार पटेल समाजाचे आहेत.
पटेल समाजातही तीन उपजाती असून, यात कडवा, लेउवा आणि आंजना असे तीन पटेल समाजातील लोक आहेत. यातील आंजना पटेल हे ओबीसी आहेत. तर कडवा आणि लेउवा पटेलांनी ओबीसी आरक्षणाची मागणी केली आहे. आरक्षण न मिळाल्याने या दोन्ही गटातील लोक भाजपवर नाराज आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement