एक्स्प्लोर

Gujarat: 2002 मधील गोध्रा दंगलीतील 22 आरोपींची निर्दोष मुक्तता; गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यातील न्यायालयाचा निर्णय

2002 Post Godhra Riots Case: 2002 साली झालेल्या गोध्रा दंगलीतील 22 आरोपी निर्दोष. गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यातील न्यायालयाचा निर्णय. सबळ पुरावे नसल्याचं कारण देत केलं निर्दोष मुक्त.

2002 Post Godhra Riots Case: 2002 साली झालेल्या गोध्रा दंगलीतील (Post Godhra Riots) 22 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आली आहे. गुजरातमधील (Gujarat News) पंचमहल जिल्ह्यातील  न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 2002 साली गोध्रामध्ये (Godhra Riots) दंगल भडकली होती. त्यात 17  जणांचा बळी गेला होता. याच प्रकरणी यातील 22 आरोपींना सबळ पुरावे नसल्याचं कारण देत निर्दोष मुक्त केलं गेलं आहे.

गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील हलोल शहरातील  न्यायालयानं गोध्रा दंगली प्रकरणात (Godhra Riots Case) पुराव्याअभावी 22 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांवर दोन मुलांसह अल्पसंख्याक समाजातील 17 जणांची हत्या केल्याचा आरोप होता. बचाव पक्षाचे वकील गोपाल सिंह सोलंकी यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्ष त्रिवेदी यांनी   सर्व 22 आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे. त्यापैकी आठ जणांचा खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत्यू झाला होता.

बचाव पक्षाच्या वकिलांनी पुढे बोलताना सांगितलं की, "जिल्ह्यातील देलोल गावात दोन मुलांसह अल्पसंख्याक समाजातील 17 लोकांची हत्या आणि दंगल घडवल्याच्या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे." 28 फेब्रुवारी 2002 रोजी ही दंगल घडली होती आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं त्यांचे मृतदेह जाळण्यात आले होते.

प्रकरण नेमकं काय? 

27 फेब्रुवारी 2002 रोजी पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा शहराजवळ जमावानं साबरमती एक्स्प्रेसची एक बोगी पेटवल्यानंतर जातीय दंगली उसळल्या. बोगी जळण्याच्या घटनेत 59 प्रवासी असून त्यापैकी बहुतेक प्रवासी 'कारसेवक' होते. ते अयोध्येहून परतले होते. देलोल गावात झालेल्या हिंसाचारानंतर हत्या आणि दंगलीशी संबंधित भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर आणखी एका पोलीस निरीक्षकानं घटनेच्या जवळपास दोन वर्षांनी नवा गुन्हा नोंदवला आणि दंगलीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली 22 जणांना अटक केली.

बचाव पक्षाच्या वकिलांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, फिर्यादी आरोपींविरुद्ध पुरेसे पुरावे गोळा करण्यात अपयशी आले आणि साक्षीदारही ऐनवेळी पलटले. या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह सापडलेच नाही. तपासादरम्यान, पोलिसांनी नदीकाठी एका निर्जन जागेवरून काही अवशेष जप्त केले होते. परंतु, ते मोठ्या प्रमाणात होरपळल्यामुळे त्यांच्या तपासात काहीच समोर येऊ शकलं नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jammu and Kashmir Bank :  फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Vidhan Sabha Election Exit Poll : केजरीवालांच्या आपची पुन्हा सत्तेत येण्याची संधी हुकण्याची शक्यताCity 60 News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : 05 Feb 2025 : ABP MajhaDelhi Vidhan Sabha Election Exit Poll : बहुतांशी एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता येण्याचा अंदाजSuresh Dhas : संतोष देशमुख हत्येचा तपास आणि  गृहमंत्र्यांचं सहकार्य; सुरेश धस नेमकं काय म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jammu and Kashmir Bank :  फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
Raigad : रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
Embed widget