Gujarat Bhupendra Patel Ministers List: गुजरातमध्ये राजकीय उलथापालथ, सहा मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं, रिवाबा जडेजासह या नेत्यांना संधी, भूपेंद्र पटेल सरकारमध्ये मंत्र्याची यादी समोर
Gujarat Bhupendra Patel Ministers List: गुजरातमधील प्रमुख शहरांमध्ये निवडणूक प्रचारापूर्वी, भाजपने राज्यमंत्र्यांची संख्या वाढवली आहे. आतापर्यंत सरकारमध्ये फक्त १६ मंत्री होते. नवीन मंत्रिमंडळात आता एकूण २५ मंत्री आहेत. मागील मंत्र्यांपैकी फक्त सहा जणांना पुन्हा मंत्रीपद देण्यात आले आहे.

अहमदाबाद: भाजपचे सरकार असलेल्या गुजरातमध्ये काल (गुरुवारी) राजकीय हालचाली वेगाने (Gujarat Bhupendra Patel Ministers List) झाल्या. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व १६ मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. आज (शुक्रवारी) सकाळी गांधीनगरमध्ये सकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा (Gujarat Bhupendra Patel Ministers List)पार पडणार आहे. यात कोणाला संधी मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता नव्या मंत्र्यांची यादी समोर आली आहे.(Gujarat Bhupendra Patel Ministers List)
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. आज (शुक्रवारी) गांधीनगर येथील महात्मा मंदिरात झालेल्या शपथविधी सोहळ्यात १० माजी मंत्र्यांच्या जागी एकूण १८ नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. नवीन मंत्रिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्वही वाढविण्यात आले आहे. टीम इंडियाचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा आणि माजी मंत्री मनीषा वकील यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करणारे राज्यातील प्रमुख नेते अर्जुन मोधवाडिया यांना मंत्रीपद देण्यात आले. भूपेंद्र पटेल यांच्या टीममध्ये माजी आयपीएस अधिकारी पीसी बरंडा यांचाही समावेश करण्यात आला आहे. मोरबीचे आमदार कांतिभाई अमृतिया यांचीही मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Gujarat: CM Bhupendra Patel meets Governor to seek permission for swearing-in ceremony of new cabinet
— ANI Digital (@ani_digital) October 17, 2025
Read @ANI Story | https://t.co/pBz38BDMqX#Gujarat #BhupendraPatel #Governor #CabinetExpansion pic.twitter.com/u4VQin6nhC
Gujarat Bhuupendra Patel Ministers List: भूपेंद्र पटेल सरकारमधील मंत्र्यांची यादी
पुरुषोत्तम सोलंकी
कुंवरजी बावलिया
प्रफुल्ल पानशेरिया
ऋषिकेश पटेल
कानू देसाई
हर्ष संघवी
अर्जुन मोढवाडिया
नरेश पटेल
कांति अमृतिया
प्रद्युम्न वाज
कौशिक वेकारिया
स्वरूपजी ठाकोर
त्रिकम छंगा
जयराम गामित
जीतू वाघाणी
दर्शनाबेन वाघेला
रिवाबा जड़ेजा
पी.सी. बरंडा
रमेश कटारा
ईश्वरसिंह पटेल
मनीषा वकील
प्रवीण माली
डॉ. प्रद्युम्न वाजा
संजयसिंह महिड़ा
कमलेश पटेल
Gujarat Bhuupendra Patel Ministers List: मोठी नावे वगळण्यात आली
भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात एकोणीस नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात मंत्रिमंडळातील सदस्यांची कमाल संख्या २७ असू शकते. मागील सरकारच्या तुलनेत नऊ मंत्र्यांची भर पडली आहे, परंतु हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जयेश राडाडिया यासारख्या प्रमुख नावांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. विद्यमान विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांना मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती, परंतु त्यांना स्थान मिळाले नाही. अशा परिस्थितीत, ते विधानसभेचे अध्यक्ष राहतील हे आता निश्चित झाले आहे. प्रमुख नेत्यांमध्ये जितू वाघानी यांची पुन्हा मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी गुजरातमध्ये भाजपचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्याचप्रमाणे, पोटनिवडणुकीत विजयी झालेले स्वरूपजी ठाकोर यांना अल्पेश ठाकरे यांच्या जागी संधी मिळाली, तर अल्पेश ठाकोर कायम राहिले.
























