Gujrat Election : गुजरातमध्ये महापालिका निवडणुकीत भाजपची मुसंडी, 483 जागा जिंकण्यात यश
अहमदाबाद आणि वडोदरासह सहा महानगरपालिकांच्या 575 जागांसाठी ही निवडणूक होती. भाजपला 483 जागा जिंकण्यात यश मिळालं आहे, तर कॉंग्रेसला केवळ 45 जागा जिंकता आल्या आहेत.
वडोदरा : गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. मागील निवडणुकांच्या तुलनेत शहरी भागात भाजपने जास्त जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या 2021 मधील जागा आणि 2016 मधील जागांची तुलना केली तर चित्र स्पष्ट होत आहे. अहमदाबाद आणि वडोदरासह सहा महानगरपालिकांच्या 576 जागांसाठी ही निवडणूक होती.
2016 मध्ये भाजपला 389 जागांवर विजय मिळवता आला होता, तर कॉंग्रेसला केवळ176 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. 2021 मध्ये भाजपला 483 जागा जिंकण्यात यश मिळालं आहे, तर काँग्रेसच्या 2016 च्या तुलनेत 121 जागा कमी झाल्या आहे. कॉंग्रेसला केवळ 55 जागा जिंकता आल्या आहेत. असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष AIMIM अहमदाबादमध्ये सात जागांवर विजय मिळवला आहे. AIMIM पहिल्यांदा गुजरातमध्ये निवडणूक लढली.
गुजरातच्या बड्या शहरांमधील भाजपची कामगिरी- राजकोट: 68
- वडोदरा: 69
- जामनगर: 50
- भावनगर: 44
- सूरत: 93
- अहमदाबाद: 159
- राजकोट: 4
- वडोदरा: 7
- जामनगर: 11
- भावनगर: 8
- अहमदाबाद: 25
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजय भाजपसाठी महत्त्वाचा आहे. कारण पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुकांतील मोठ्या यशाने प्रोत्साहित झाल्याने भाजपला विधानसभा निवडणुकीत कमकुवत कॉंग्रेसविरूद्ध लढणे अधिक सोपं होईल. मागील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने जोरदार कामगिरी केली होती आणि 10 टक्के मतदानात वाढ केली होती. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील धार कमी होताना दिसत आहे.
हार्दिक पटेल यांची प्रतिक्रिया
गुजरातमधील काँग्रेसच्या पराभवावर बोलताना हार्दिक पटेल यांनी म्हटलं की, "पुन्हा एकदा सांगतो गुजरातची जनता भाजपमुळे त्रस्त आहे. आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागेल. लडेंगे और जीतेंगे"