गुजरात एटीएस, कोस्टगार्डची पाकिस्तानी बोटवर कारवाई, 9 ड्रग्ज माफियांना अटक
बोट पोरबंदर येथे आल्यानंतर समुद्रात गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्ड आपल्यावर कारवाई करणार या भीतीने बोटवरील ड्रग माफियांनी बोट उडवली. मात्र एटीएस आणि कोस्ट गार्डने बोटवरील 9 जणांना अटक केली आहे.
गांधीनगर (गुजरात) : पोरबंदरमध्ये गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्डने ड्रग्ज माफियांवर कारवाई केली आहे. कोस्ट गार्ड आणि एटीएसच्या टीमला पाहून ड्रग्ज माफियांनी बोट स्फोटकांनी उडवून ड्रग्ज साठा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानमधून बोटीतून ड्रग्ज आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुजरात एटीएसने या प्रकरणी 9 ड्रग्ज माफियांना अटक केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या बोटवर 100 किलो ड्रग्ज साठा होता, याची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात आहे. ग्वादर पोर्टवरुन ही बोट निघाली होती. मात्र हा ड्रग्जचा साठा भारतात कुणाकडे जात होता याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
बोट पोरबंदर येथे आल्यानंतर समुद्रात गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्ड आपल्यावर कारवाई करणार या भीतीने बोटवरील ड्रग माफियांनी बोट उडवली. मात्र एटीएस आणि कोस्ट गार्डने बोटवरील 9 जणांना अटक केली आहे. हे सर्वजण इराणी नागरिक असल्याच समोर येत आहे. हा डग्जसाठी कुणी आणि कुणासाठी पाठवला होता याचा अधिक तपास सुरु आहे.