एक्स्प्लोर

मोदींच्या मतदारसंघात भाजपला आव्हान देणाऱ्या श्वेता ब्रह्मभट्ट यांचा निकाल

मणिनगर हा तोच मतदारसंघ आहे, ज्यामध्ये पंतप्रधान बनण्यापूर्वी नरेंद्र मोदी विधानसभेची निवडणूक लढवत होते.

गांधीनगर: भाजपने पुन्हा एकदा गुजरातमध्ये कमळ फुलवलं आहे. मात्र पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना दीडशेचा आकडा गाठता आलेला नाही. दुपारपर्यंत भाजपने 182 पैकी शंभरहून अधिक जागांवर आघाडी घेतली. गुजरात निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं असताना, गुजरातचं लक्ष मात्र मणिनगरकडे लागलं होतं. मणिनगर हा तोच मतदारसंघ आहे, ज्यामध्ये पंतप्रधान बनण्यापूर्वी नरेंद्र मोदी विधानसभेची निवडणूक लढवत होते. या मतदारसंघात पुन्हा एकदा मतदारांनी भाजपलाच पसंती दिली आहे. मणिनगरमधून भाजपचे उमेदवार सुरेशभाई धनजीभाई पटेल हे तब्बल 75199 मतांनी विजयी झाले आहेत. सुरेशभाई पटेल यांनी काँग्रेसची युवा नेता श्वेता ब्रह्मभट्ट यांचा पराभव केला. सुरेशभाई पटेल यांना 1 लाख 16 हजारांहून अधिक मतं मिळाली, तर श्वेताबेन यांना 40914 मतं मिळाली. श्वेता ब्रह्मभट्ट यांचं धाडस मणिनगर हा भाजपचा गड मानला जातो. या मतदारसंघात 2002,2007 आणि 2012 मध्ये नरेंद्र मोदी यांनी विजय मिळवला होता. तर 1990 ते 1998 पर्यंत भाजप नेते कमलेश पटेल यांनी या मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं होतं. मात्र तरीही याच मतदारसंघात भाजपच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस श्वेता ब्रह्मभट्ट यांनी दाखवलं होतं. 2012 मध्ये नरेंद्र मोदी यांनी याच मतदारसंघात, आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांची पत्नी आणि काँग्रेस उमेदवार श्वेता भट्ट यांचा 86 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे सुरेश पटेल विजयी झाले होते. कोण आहे श्वेता ब्रह्मभट्ट? 34 वर्षीय श्वेता ब्रह्मभट्ट उच्चशिक्षित आहे. श्वेता यांनी मॅनेजमेंट क्षेत्रातील मानाच्या IIM बंगळुरुतून शिक्षण घेतलं आहे. आयआयएममध्ये त्यांनी ‘भारत- महिलांचं नेतृत्व’ हा कोर्स केला आहे. श्वेता यांनी 2005 मध्ये लंडनमधील वेस्टमिंस्टर युनिव्हर्सिटीतून ‘इंटरनॅशनल फायनान्स’चा अभ्यास केला आहे. भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक सल्लागार म्हणून काम केलं आहे. श्वेता यांचे वडिल नरेंद्र ब्रह्मभट्ट हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र यंदा त्यांच्याऐवजी श्वेता यांना तिकीट देण्यात आलं. सिस्टिम बदलण्यासाठी सिस्टिमचा भाग बनणं आवश्यक असतं, त्याच उद्देशाने त्यांनी निवडणूक लढवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोरSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणी आणखी एकजण ताब्यात, पोलिसांकडून तपासाला वेगABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
Embed widget