एक्स्प्लोर
आता हॉस्पिटलमधील रुग्णांच्या अन्नपदार्थांवर जीएसटी नाही
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांवर जीएसटी न लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण जे व्यक्ती रुग्णालयात दाखल नसतील, त्यांना अन्नपदार्थांचे पूर्ण मूल्य चुकवावंच लागणार आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलासा दिला आहे. कारण, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांवर जीएसटी न लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण जे व्यक्ती रुग्णालयात दाखल नसतील, त्यांना अन्नपदार्थांचे पूर्ण मूल्य चुकवावंच लागणार आहे.
महसूल विभागाने याबाबतचा एफएक्यू (Frequently Asked Question) जारी केला आहे. त्यानुसार, रुग्णालयातील वरिष्ठ चिकित्सक, सल्लागार, टेक्निशियनकडून देण्यात येणाऱ्या सेवा हे सर्व जीएसटीतून मुक्त करण्यात आले आहेत. कारण, या सर्व सुविधा हेल्थकेअरअंतर्गत असल्याने त्या करमुक्त करण्यात आल्या आहेत.
तसेच, हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांसाठी देण्यात येणारे अन्नपदार्थ हे देखील हेल्थकेअरअंतर्गत येत असल्याने, ते जीएसटीतून वगळण्यात आले आहेत.
दरम्यान, जीएसटीमधील हेल्थकेअरच्या सेवांमध्ये कोणताही आजार, जखम, महिलांच्या बाळंतपणाच्या काळातील देखभाल, उपचार आणि त्याचे निदान आदींचा समावेश आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांसाठी दिलासा मिळाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement