मार्चमध्ये GST पासून छप्परफाड कलेक्शन, विक्रमी 1.42 कोटी रुपयांचा कर जमा
GST Collection at Record High: आतापर्यंतचा विचार करता या मार्च महिन्यात सर्वाधिक जीएसटी कलेक्शन झालं आहे.
नवी दिल्ली: देशात जीएसटीचा कायदा लागू केल्यानंतर आतापर्यंतचा विक्रमी कर या मार्चमध्ये जमा झाला आहे. या मार्चमध्ये 1.42 लाख कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. या आधी जानेवारी महिन्यामध्ये 1.40 लाख कोटी रुपयांचा कर जमा झाला होता. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यामध्ये 1,42,095 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. त्यामध्ये केंद्राच्या CGST चा हिस्सा 25,830 कोटी रुपये आणि राज्याच्या SGST चा हिस्सा हा 32,378 कोटी रुपये इतका आहे. IGST चा हिस्सा हा 39,131 कोटी रुपये आणि सेसचे योगदान हे 9417 कोटी रुपये इतकं आहे. यामध्ये 981 रकोटी रुपयांचे कलेक्शन हे सामानाच्या आयातीवर लावण्यात येणार आहे. ग्रॉस जीएसटी कलेक्शन आतापर्यंत सर्वाधिक जास्त आहे.
✅ All time high Gross #GSTCollection in March 2022, breaching earlier record of ₹1,40,986 crore collected in January 2022
— Ministry of Finance (@FinMinIndia) April 1, 2022
✅ ₹1,42,095 crore gross #GST revenue collected in the month
Read more ➡️ https://t.co/WVBKPBkmTO
(1/2) pic.twitter.com/ywPJxQfElw
आतापर्यंतची आकडेवारी पाहता दरवर्षी जीएसटीच्या कलेक्शनमध्ये वाढच होताना दिसत आहे. गेल्या वर्षी, मार्च 2021 च्या तुलनेत या वर्षी जीएसटी कलेक्शन हे 15 टक्क्याने जास्त आहे. मार्च 2020 च्या तुलनेत ही रक्कम 46 टक्क्यांनी जास्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या: