एक्स्प्लोर
Advertisement
81 लाख आधार कार्ड रद्द, तुमचं स्टेटस काय?
केंद्र सरकारने विविध कारणांमुळे जवळपास 81 लाख आधार कार्ड रद्द केले आहेत. तुमचं आधार कार्ड चालू आहे का, इथे पाहू शकता.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आतापर्यंत जवळपास 81 लाख आधार कार्ड विविध कारणांमुळे रद्द केले आहेत. मात्र कोणत्या राज्यातील किती आधार कार्ड रद्द केले, याची नोंद करण्यात आलेली नाही. माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी राज्यसभेत याबाबत माहिती दिली.
आधार कार्ड अधिनियमाच्या नियमानुसार हे आधार कार्ड रद्द करण्यात आले आहेत. कागदपत्र, बायोमेट्रिक कारण किंवा एकाच व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक आधार कार्ड असल्यामुळे आधार कार्ड रद्द केले जाऊ शकतात, असं चौधरी यांनी स्पष्ट केलं.
आधार कार्ड रद्द करण्याचे अधिकार UIDAI ला आहेत.
तुमचं आधार कार्ड चालू आहे का?
तुमचं आधार कार्ड चालू आहे की बंद हे तुम्ही UIDAI च्या वेबसाईटवर पाहू शकता. त्यासाठी https://uidai.gov.in या लिंकवर क्लिक करा.
या लिंकवर क्लिक केल्यानंतर UIDAI चं होम पेज येईल. या होम पेजवर 'व्हेरीफाय आधार नंबर' असा पर्याय दिसेल.
'व्हेरीफाय आधार नंबर' यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढील पेजवार जाल. तिथे तुमचा आधार कार्ड नंबर आणि सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर पुढील स्टेपमध्ये तुमचं आधार कार्डचं स्टेटस सांगितलं जाईल.
संबंधित बातम्या :
अर्थ मंत्रालयाकडून जवळपास साडे 11 लाख पॅन कार्ड रद्द
जवळपास साडे 11 लाख पॅन कार्ड रद्द, तुमचं स्टेटस काय?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement