सरकारने शेतकरी, मजूर, गरिबांच्या खात्यात 7500 रुपये आर्थिक मदत जमा करावी : सोनिया गांधी
सरकारने शेतकरी, मजूर आणि गरिबांच्या खात्यात तातडीने 7 हजार 500 रुपये आर्थिक मदत म्हणून जमा करावेत," असं आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी देश लॉकडाऊन आहे. सगळे व्यवहार ठप्प आहेत. अशा कठीण प्रसंगात सर्वाधिक हाल कष्टकरी वर्गाचे होत आहेत. त्यामुळे सरकारने शेतकरी, मजूर आणि गरिबांच्या खात्यात तातडीने 7 हजार 500 रुपये आर्थिक मदत म्हणून जमा करावेत," असं आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं आहे. तसंच देशभरात कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी केलेल्या उपाययोजनांबाबत सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. "सध्या आपल्याला सगळ्यांनी मिळून कोरोना व्हायरसविरोधात लढण्याची गरज असताना भाजप द्वेषाचा विषाणू पसरवत आहे," असा आरोप सोनिया गांधी यांनी केला.
सोनिया गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित केलं. यामध्ये पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी सामील झाले होते. "काँग्रेसने जे काही सल्ले दिले होते, त्याकडे केंद्र सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. यातून भाजपचा काँग्रेसप्रति पूर्वग्रह दिसतो," असंही सोनिया गांधी यांनी सांगितलं.
Coronavirus | लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय नाही, टेस्टिंग सर्वात मोठं शस्त्र : राहुल गांधी
गरीब-शेतकरी, मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये जमा करा! "अशा कठीण प्रसंगात सरकारने शेतकरी, मजूर आणि गरिबांच्या खात्यात तातडीने 7 हजार 500 रुपये आर्थिक मदत म्हणून जमा करावेत," असं आवाहनही सोनिया गांधी यांनी केलं आहे. "गरीब, मजुरांना अन्न सुरक्षा देण्यासाठी तातडीने पावलं उचलायला हवी," असंही त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सोनिया गांधी यांनी सांगितलं की, "लॉकडाऊनमुळे देशातील शेतकरी अडचणीत आहे. कमकुवत आणि अस्पष्ट खरेदी धोरणांसह पुरवठ्याच्या साखळीत येणाऱ्या अडचणींनी शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्या अडचणी लवकरात लवकर दूर करायला हव्या. खरीप पिकासाठीही शेतकऱ्यांना सुविधा मिळायल्या हव्या."
कोविड-19 च्या तपासणीबाबत सोनिया गांधींचे आरोप कोविड-19 तपासणीवरुन सोनिया गांधी यांनी सरकारवर टीका करत अनेक आरोपही केले आहेत. त्या म्हणाल्या की, "देशभरात कोरोना व्हायरसची ज्या प्रमाणात तपासणी सुरु आहे ती पुरेशी नाही. टेस्टिंगची संख्या वाढवण्याची गरज आहे." याशिवाय "रॅपिड टेस्ट करण्यातही सरकारला फारसं यश आलं नाही," असं त्यांनी म्हटलं. "आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगल्या दर्जाचे पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात सरकारला अपयश आलं आहे. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी विरोधक आणि काँग्रेसकडून जे सल्ले देण्यात आलं, त्याकडे सरकारने लक्ष दिलं नाही," असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे की, "कोरोनाच्या साथीविरोधात लढण्यासाठी टेस्टिंग सर्व मोठं शस्त्र आहे, असं काँग्रेसने सातत्याने सांगूनही सरकारने तपासणीचा वेग वाढवलेला नाही. देशात टेस्टिंगची क्षमता कमी आहे, याशिवाय जे पीपीई किट दिले, ते देखील चांगल्या दर्जाचे नाहीत." Coronavirus | Rahul Gandhi PC | लॉकडाऊन म्हणजे पॉझ बटण, कोरोनावरील उपाय नाही : राहुल गांधी