एक्स्प्लोर
Advertisement
निनावी संपत्तीची माहिती दिल्यास 5 कोटींपर्यंतचं इनाम!
निनावी व्यवहार माहिती इनाम योजना, 2018 अंतर्गत हे बक्षीस माहिती देणाऱ्याला देण्यात येईल.
नई दिल्ली : निनावी संपत्तीवर टाच आणण्यासाठी अर्थमंत्रालयाने एक कोटी रुपयांचं इनाम देण्याची योजना सुरु केली. आयकर विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. यानुसार, एखाद्या व्यक्तीने निनावी प्रतिबंधक युनिटमध्ये जाऊन सहआयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांसमोर निनावी संपत्तीबाबत माहिती दिली तर त्याला हे इनाम मिळेल.
अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार, अशा संपत्तीची माहिती आयकर विभागाच्या तपास संचालनालयाला द्यावी लागेल. यानंतर संबंधित व्यक्तीला विभागाकडून पाच कोटीपर्यंतचं इनाम दिलं जाईल. निनावी व्यवहार माहिती इनाम योजना, 2018 अंतर्गत हे बक्षीस माहिती देणाऱ्याला देण्यात येईल.
सरकारने नुकतंच 1988 च्या निनावी कायद्यात सुधारणा करुन निनावी व्यवहार कायदा, 2016 मंजूर केला आहे. निनावी संपत्तीच्या शोधासाठी सामान्य नागरिकांचं सहकार्य वाढवण्यासाठी सरकारने ह्या इनामी योजनेची घोषणा केली आहे. निनावी व्यवहार आणि संपत्ती उजेडात आणल्याने तसंच अशा संपत्तीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती देणाऱ्यांना हे बक्षीस मिळेल.
या योजनेचा लाभ परदेशी नागरिकही घेऊ शकतात. निनावी संपत्तीची माहिती देणाऱ्या व्यक्ती ओळख गुप्त ठेवली जाईल आणि संपूर्ण प्रकरणात गोपनीयताही बाळगण्यात येईल. निनावी व्यवहार माहिती इनाम योजना, 2018 बाबत आयकर विभागाची कार्यालयं आणि वेबसाईटवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे, असं मंत्रालयाने सांगितलं आहे.
करचोरीची माहिती दिल्यास 50 लाख मिळणार
इतकंच नाही तर सरकारने करचोरीची प्रकरण उजेडात आणण्यासाठीही 50 लाख रुपयांच्या बक्षीसाची योजना जाहीर केली आहे. 1961 च्या आयकर कायद्याअंतर्गत सरकारने आयकर माहिती इनाम योजना सुरु केली आहे. याअंतर्गत जर कोणी करचोरीच्या प्रकरणाची माहिती आयकर विभागाच्या तपास संचालनालयाला दिली तर तो या इनामासाठी पात्र असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement