एक्स्प्लोर
डहाणूकडून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीचा एक ट्रॅक सुरु

पालघर : पश्चिम रेल्वेच्या वाणगाव ते डहाणू रोड दरम्यान मालगाडीचे 11 डब रुळावरुन घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्री उशिरा 2.30 च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे मुंबईकडून गुजरातकडे आणि गुजरातकडून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद झाली आहे. मुंबईहून अहमदाबादकडे जाणारी मालगाडी, बाहेर गावाहून येणाऱ्या सर्व गाड्या डहाणू स्थानकात थांबल्या आहेत. तर मुंबईहून जाणाऱ्या 12 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान या अपघाताचा लोकल वाहतुकीवर काहीही परिणाम झालेला नाही. पश्चिम मार्गावरील लोकल वाहतूक सुरळीत आहे.
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















