एक्स्प्लोर
सोनं आणि हिऱ्यावर 3 टक्के जीएसटी, 1 जुलैपासून जीएसटी लागू

नवी दिल्ली: जीएसटी लागू झाल्यानंतर सोन्यावर किती टक्के कर लागणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर जीएसटी समितीनं सोन्यावर 3 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच हिऱ्यांच्या दागिन्यावरही 3 टक्के जीएसटी लावण्यात येईल. कररचनेसाठी 5, 12, 18 आणि 28 टक्के असा स्लॅब निश्चित करण्यात आला होता. मात्र, सोन्यासाठी 3 टक्क्याचा नवीन स्लॅब तयार करण्यात आला आहे. आज चपला, विडी, रेडिमेड गारमेंट्स इत्यादी वस्तूंसाठीही जीएसटी निश्चित करण्यात आला आहे. 500 रुपये किंमतीखालील चपलांसाठी 5 टक्के तर त्यापेक्षा महाग चप्पलांसाठी 18 टक्के जीएसटी लावण्यात येईल. तर बीडीवर 28 टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. सर्व राज्यांनी मंजुरी दिल्यामुळं 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार असल्याचं जेटलींनी सांगितलं आहे. संबंधित बातम्या: जमीन आणि घरभाड्यावर जीएसटी लागणार! 1 जुलैपासून जीएसटी लागू होण्याचा मार्ग मोकळा कीर्तनकार, भागवत कथाकारांनाही जीएसटी, कररचनेत बदल जीएसटी आल्यानं नेमका फायदा काय? केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळाकडून जीएसटी कौन्सिलला मंजुरी
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















