एक्स्प्लोर
'गांधी' आडनावामुळेच दोनवेळा खासदार झालो : वरुण गांधी
‘गांधी’ आडनावामुळेच कमी वयात दोनवेळा लोकसभा खासदार बनण्यास मदत झाल्याचं वक्तव्य भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी केलं. तसंच गॉडफादरशिवाय राजकारणात पाय रोवणं कठीण असल्याचंही वरुण गांधी म्हणाले.
हैदराबाद : ‘गांधी’ आडनावामुळेच कमी वयात दोनवेळा लोकसभा खासदार बनण्यास मदत झाल्याचं वक्तव्य भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी केलं. तसंच गॉडफादरशिवाय राजकारणात पाय रोवणं कठीण असल्याचंही वरुण गांधी म्हणाले.
वरुण गांधी उत्तरप्रदेशमधील सुलतानपूरमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत. ते भाजपचे खासदार आहेत. हैदराबादेतील एका कार्यशाळेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मी आज हैदराबादमध्ये आलो आणि तुम्ही मला ऐकता आहात. मात्र जर माझ्या नावापुढे गांधी आडनाव नसतं आणि मी दोनवेळा खासदार नसतो तर तुम्ही मला ऐकायला आला नसता, असंही वरुण गांधी पुढे म्हणाले.
दरम्यान आज तरुणांना राजकारणात यायचं आहे, पण गॉडफादर नसल्यामुळे ते राजकारणापासून दूर राहात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement