Bus Accident at Goa: चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस थेट खड्ड्यात कलंडली; पणजीहून हैदराबादला निघालेल्या बसचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, तर 25 जण जखमी
Bus Accident at Goa: गोव्यातील पणजीहून हैदराबादला निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले आहेत.
Hyderabad Bus Accident at Goa: पणजीहून (Panaji) हैदराबादला (Hydrabad) जाणाऱ्या खासगी बसला धारबांदोडा येथे अपघात होऊन चालक जागीच ठार झाला आहे. या अपघातात (Accident) इतर 25 जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
कसा घडला अपघात?
पणजीहून हैदराबादला निघालेल्या खाजगी बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. रस्त्याच्या एका वळणावर बस आली आणि चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कलंडली आणि अपघात झाला. यावेळेला या बसमध्ये 23 प्रवासी आणि तीन चालक प्रवास करत होते. भरधाव बसचा अचानक अपघात होऊन एका बाजुला कलंडल्यानं प्रवाशांनी आरडाओरड केली. प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना बाहेर काढलं. बसचा चालक गाडीखाली आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोन चालक आणि 23 प्रवासी जखमी झाले आहेत.
बस कलंडल्यामुळे झालेल्या अपघातात नऊ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्तांची मदत केली. स्थानिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.
9 जण गंभीर जखमी
पणजीमध्ये झालेल्या अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. पणजीतील बांबोळी येथील गोमेकॉ या नऊ जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी वामशी मुशरी (वय 23), श्वेता गदाम (वय 22), लिप्पस्वामी पिल्लई (वय 26), अर्चना व्ही (वय 25), आशिश सिरना (वय 21), साईच्छा लाडमतिनी (वय 25), शिवलिंग स्वामी, नितीन सोमण (वय 21), सौम्या कोटार (वय 24) आणि शिवराम रेड्डी (वय 40) यांचा समावेश आहे. इतर जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :