एक्स्प्लोर
गोव्यात पनवेलच्या तरुणाकडून 1 कोटी 99 लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त
चव्हाणच्या बॅगेत 1 हजारच्या 19 हजार 985 नोटा आणि 500 च्या 14 नोटा मिळून 1 कोटी 99 लाख 92 हजार रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या.

पणजी : गोव्यातील रेल्वे पोलिसांनी नवीन पनवेलमधील एका तरुणाकडून तब्बल 1 कोटी 99 लाख 92 हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. थिवी रेल्वे स्थाककावर ही कारवाई करण्यात आली. करमळी येथील लोकमान्य टीळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या उन्हाळी विशेष गाडीमधून प्रवास करणाऱ्या नवीन पनवेल इथल्या लवू चव्हाण याच्याकडे या जुन्या नोटा आढळून आल्या आहेत.
रेल्वे पोलिस आज नियमित पाहणी करत असताना करमळी इथून मुंबईला जाणाऱ्या उन्हाळी विशेष गाडीमध्ये लवू चव्हाण बसलेल्या ठिकाणी एक बॅग आढळली. रेल्वे पोलिसांनी चव्हाणला ती बॅग उघडून दाखवण्यास सांगितली मात्र त्याने त्याला नकार दर्शवला. जेव्हा रेल्वे पोलिसांनी ती बॅग उघडली त्यावेळी त्यात नोटाबंदीनंतर व्यवहारातून बाद ठरवलेल्या जवळपास 2 कोटी रुपयांच्या 1 हजार आणि 500 रुपयांच्या नोटा आढळून आल्या.
चव्हाणच्या बॅगेत 1 हजारच्या 19 हजार 985 नोटा आणि 500 च्या 14 नोटा मिळून 1 कोटी 99 लाख 92 हजार रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या.
रेल्वे पोलिसांनी चव्हाणला स्थानिक पोलिसांकडे सुपुर्द केले आहे.स्थानिक पोलिस पुढील कारवाई करणार आहेत. रेल्वे पोलिस दलाच्यावतीने हेड कॉन्स्टेबल विश्राम देसाई आणि डी. एस. मीना यांनी ही कारवाई केली.
आणखी वाचा























