एक्स्प्लोर

Goa Congress Crisis : गोव्यात काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये, दिगंबर कामत यांची हकालपट्टी

Goa Congress Crisis : चेन्नईला गेलेल्या काँग्रेसच्या पाच आमदारांमुळे सध्या काँग्रेस फुटीचा प्रयत्न थांबला असल्याचं बोललं जात आहे. कारण, 11 आमदारांपैकी सध्या सहा आमदार गोव्यात आहेत.

Goa Congress Crisis : माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांची पक्षाच्या कायम स्वरूपी निमंत्रक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका कामत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. काँग्रेस आमदारांना भाजपमध्ये नेण्यासाठी दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दिगंबर कामत यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करणारे पत्र प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी विधानसभा सभापती यांना यापूर्वीच दिले आहे.

पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत पक्षाने आमदार मायकल लोबो यांची गेल्या रविवारी विरोधी पक्ष नेतेपदावरून हकालपट्टी केली होती. गेल्या रविवारी कॉग्रेस अंतर्गत कलह उफाळून आला होता. मात्र पक्षांतरासाठी आवश्यक आमदार संख्या समीकरण न जुळल्याने बंड फसलं होते. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष फुटीच्या भीतीने सावध काँग्रेसने आपले 5 आमदार शनिवारी गोवा बाहेर हलवले आहेत.

चेन्नईला गेलेल्या काँग्रेसच्या पाच आमदारांमुळे सध्या काँग्रेस फुटीचा प्रयत्न थांबला असल्याचं बोललं जात आहे. कारण, 11 आमदारांपैकी सध्या सहा आमदार गोव्यात आहेत. तर दबाव टाळण्यासाठी 5 आमदार चेन्नईला गेले आहेत. गोव्यात असलेले सहाही आमदार भाजपमध्ये जाण्यासाठी तयार असून केवळ चेन्नईला गेलेल्या पाच आमदारांमुळे काँग्रेसमधील फुट पुढे गेल्याची माहिती आहे. याच वेळी काँग्रेसनं विरोधी पक्ष नेते पदावरून हकालपट्टी केल्यानंतर मालकल लोबो यांनी गुरुवारी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा गोव्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण, आपण प्रकृतीच्या कारणास्तव अधिवेशनाला गैरहजर राहिल्याचं लोबो यांचं म्हणणं आहे. असं असलं तरी गोवा विमानतळावर मात्र मायकल बोलो प्रसारमाध्यमांच्या कॅमेरामध्ये कैद झाले. यावेळी त्यांनी मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो असं उत्तर दिले. त्यामुळे काँग्रेसमधील बंड सध्या थंड झाल्याची चर्चा असली तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. दरम्यान, चेन्नईला गेलेले पाच आमदार काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. कारण, काँग्रेसमधील बंड किंवा फुट या पाच आमदारांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे.तर, राष्ट्रपती निवडणुकीसाठी काँग्रेसचे पाचही आमदार गोव्यात परतणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. 

चेन्नईला गेलेले काँग्रेस आमदार खालीलप्रमाणे
1 ) एल्टम डिकोस्टा
2 ) रूदर्फ फर्नांडिस
3 ) युरि आलेमाव
4 ) संकल्प आमोणकर
5 ) कार्लूस फरेरा

गोव्यातच असलेले काँग्रेस आमदार
1 ) दिगंबर कामत
2 ) मायकल लोबो
3 ) डिलायल लोबो
4 ) राजेश फळदेसाई
5 ) अॅलेक्स सिक्वेरा
6 ) केदार नाईक

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget