Goa Congress Crisis : गोव्यात काँग्रेस अद्यापही फुटीच्या उंबरठ्यावर! महाराष्ट्रप्रमाणे सारं प्लॅनिंग दिल्लीतून
Goa Congress Crisis : गोव्यात काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे. मुख्यबाब म्हणजे या साऱ्यांची सुत्र सध्या महाराष्ट्रप्रमाणे दिल्लीतून हालवली जात असल्याचं बोललं जात आहे.
Goa Congress Crisis : गोव्यात काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे. मुख्यबाब म्हणजे या साऱ्यांची सुत्र सध्या महाराष्ट्रप्रमाणे दिल्लीतून हालवली जात असल्याचं बोललं जात आहे. सध्या काँग्रेसचे 11 आमदार गोव्यात आहे. पैकी 8 आमदार हे नवे आहेत. त्यामुळे भाजपमध्ये गेल्यानंतर फेरनिवडणुका टाळण्यासाठी किमान एक तृतिअंश आमदारांची गरज आहे. असं असताना आता चेन्नईला गेलेल्या काँग्रेसच्या पाच आमदारांमुळे सध्या काँग्रेस फुटीचा प्रयत्न थांबला असल्याचं बोललं जात आहे. कारण, 11 आमदारांपैकी सध्या सहा आमदार गोव्यात आहेत. तर दबाव टाळण्यासाठी 5 आमदार चेन्नईला गेले आहेत. गोव्यात असलेले सहाही आमदार भाजपमध्ये जाण्यासाठी तयार असून केवळ चेन्नईला गेलेल्या पाच आमदारांमुळे काँग्रेसमधील फुट पुढे गेल्याची माहिती आहे.
याच वेळी काँग्रेसनं विरोधी पक्ष नेते पदावरून हकालपट्टी केल्यानंतर मालकल लोबो यांनी काल मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा गोव्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण, आपण प्रकृतीच्या कारणास्तव अधिवेशनाला गैरहजर राहिल्याचं लोबो यांचं म्हणणं आहे. असं असलं तरी गोवा विमानतळावर मात्र मायकल बोलो प्रसारमाध्यमांच्या कॅमेरामध्ये कैद झाले. यावेळी त्यांनी मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो असं उत्तर दिले. त्यामुळे काँग्रेसमधील बंड सध्या थंड झाल्याची चर्चा असली तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. दरम्यान, चेन्नईला गेलेले पाच आमदार काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. कारण, काँग्रेसमधील बंड किंवा फुट या पाच आमदारांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे.तर, राष्ट्रपती निवडणुकीसाठी काँग्रेसचे पाचही आमदार गोव्यात परतणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे.
चेन्नईला गेलेले काँग्रेस आमदार खालीलप्रमाणे
1 ) एल्टम डिकोस्टा
2 ) रूदर्फ फर्नांडिस
3 ) युरि आलेमाव
4 ) संकल्प आमोणकर
5 ) कार्लूस फरेरा
गोव्यातच असलेले काँग्रेस आमदार
1 ) दिगंबर कामत
2 ) मायकल लोबो
3 ) डिलायल लोबो
4 ) राजेश फळदेसाई
5 ) अॅलेक्स सिक्वेरा
6 ) केदार नाईक