एक्स्प्लोर
Advertisement
पर्रिकर उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार
मुख्यमंत्री पर्रिकर 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी अमेरिकेहून 11 दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते.
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मुंबईमधील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बुधवारी गोव्यात परतणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून कळवण्यात आले होते. मात्र आज ते गोव्यात न परतता पुढील उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेस जाणार आहेत. आज सायंकाळी ते अमेरिकेस रवाना होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री पर्रिकर 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी अमेरिकेहून 11 दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते. न्यूयॉर्कमधील ‘स्लोन केटरिंग’ स्मृती रुग्णालयात ते उपचार घेत होते. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र उत्पल पर्रिकर आणि गोमेकॉचे डॉक्टर कोलवाळकर हेही अमेरिकेला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी गोव्यात परतल्यानंतर विश्रांती घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी विश्रांती घेतली नाही.
दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भाजप नेत्यांकडून हाती घेतला व ते लोकांच्या गर्दीत सहभागी होऊन अर्धा किलोमीटर चालत गेले. त्यानंतर ते खासगी गाडीने आपल्या निवासस्थानी निघून गेले.
दुसऱ्या दिवशी त्यांना उलटी होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सुरुवातीच्या माहितीप्रमाणे, पर्रिकर शनिवारी किंवा रविवारी गोव्यात परतणार होते. मात्र नंतर ते बुधवारी गोव्यात पोहोचतील, असे मुख्यमंत्री कार्यालयातर्फे कळवण्यात आले होते. मात्र आज त्यात पुन्हा बदल झाला असून मुख्यमंत्री आज सायंकाळी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार असून दुपारपर्यंत ते मंत्रिमंडळाला याची कल्पना देणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement