एक्स्प्लोर
Advertisement
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारांसाठी अमेरिकेला रवाना
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना पुढील उपचारासाठी अमेरिकेला रवाना करण्यात आलं आहे.
मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना पुढील उपचारासाठी अमेरिकेत हलवण्यात आलं आहे. मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात त्यांच्या स्वादूपिंडाच्या विकारावर उपचार सुरु होते. मात्र, त्यात फरक न पडल्यानं डॉक्टरांनी त्यांना अमेरिकेत पुढील उपचार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर काल रात्री त्यांना विमानानं अमेरिकेत हलवण्यात आलं आहे.
२२ ते २३ तासांचा प्रवास असल्यामुळं त्यांच्याबरोबर डॉक्टरांचं एक पथकही असल्याचं समजतं आहे.
आपल्या गैरहजेरीत कोणतीही कामे अडू नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मंत्र्याला 50 लाखांप्रयत्न निधी खर्च करण्याची परवानगी दिली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
पर्रिकरांना 15 फेब्रुवारीला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फूड पॉयझनिंगच्या त्रासानंतर पोटात दुखू लागल्याने, प्रथमत: त्यांच्यावर गोव्यातील बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार करण्यात आले. मात्र अधिकच्या उपचारासाठी त्यांना मुंबईत आणण्यात आलं होतं.
मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत 3 मंत्र्यांचा गट कार्यभार सांभाळणार
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे उपचारासाठी जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले, तर काम कोण पाहणार, असा प्रश्न होता, त्याचं उत्तर आता मिळालं आहे.
मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या गैरहजेरीत प्रशासकीय कामे खोळंबू नयेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई आणि नगर विकासमंत्री फ्रांसिस डिसोझा या 3 वरिष्ठ मंत्र्यांच्या गटाकडे सर्वाधिकार सोपवण्यात आल्याचे वृत्त आहे. या गटाला 5 कोटी रुपयांपर्यंतची कामे मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
संबंधित बातम्या :
घरातून फाईल्स क्लिअर, पर्रिकर पुढील उपचारांसाठी अमेरिकेला जाणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
लातूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement