India Antarctica : गोवा आणि अंटार्क्टिकाचा पिन कोड एकच? 'या' रहस्यमय कारणाने दोन टोकांचं नातं!
PIN Code Of Goa And Antarctica : भारतातील गोवा आणि पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिका खंडाचा पीन कोड एकच आहे. त्यामागचे कारणही तितकंच रोमांचक आहे.

Goa Antarctica Same Pin Code Reason : गोवा आणि अंटार्क्टिकाचा पिन कोड एकसारखा आहे, पण हे शक्य आहे का? होय, गोवा आणि अंटार्क्टिका, ही दोन पूर्णपणे वेगळी ठिकाणं असूनही, दोघांचाही पिन कोड 403001 हा एकच आहे. यामागे एक ऐतिहासिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाची बाब आहे.
India Antarctica Dakshin Gangotri : गोवा आणि अंटार्क्टिका, दोन विरुद्ध टोकं
गोवा हे देशातीलच नव्हे तर परदेशातीलही पर्यटकांचं एक आवडतं ठिकाण. समुद्रकिनाऱ्यांचा स्वर्ग, आल्हाददायक हवामान आणि सुंदर निसर्गदृश्य. यामुळे जगभरातील पर्यटक हे गोव्याला पसंती देतात. तर दुसऱ्या टोकाला अंटार्क्टिका, पृथ्वीवरील सर्वात थंड आणि निर्जन प्रदेश, जिथं संपूर्ण बर्फाचं राज्य आहे.
तसं पाहायला गेलं तर अंटार्क्टिका हे एक खंड आहे जे पृथ्वीच्या दक्षिणेच्या गोलार्धात वसलेलं आहे. बाराही महिने हा प्रदेश बर्फाने अच्छादित असतो. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या दक्षिण टोकालाच दक्षिण महासागर अथवा दक्षिणी महासागर म्हणतात. अशा दक्षिण महासागराने अंटार्क्टिका खंड वेढला गेला आहे. हा खंड इतर सर्व खंडांपेक्षा अधिक थंड, कोरडा, प्रचंड वारे वाहत असणारा तसेच सर्वांत जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे.
Goa Antarctic Pin Code : गोवा आणि अंटार्क्टिकाचा पिन कोड एकच कसा?
या मागे एक ऐतिहासिक घटना आहे. 1983 साली भारताने अंटार्क्टिकामध्ये आपलं पहिलं संशोधन केंद्र 'दक्षिण गंगोत्री' (Dakshin Gangotri) स्थापन केलं. पुढच्या वर्षी, म्हणजे 1984 मध्ये तेथे एक पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आलं. ही भारताच्या सीमांपलीकडील पहिली टपालसेवा होती.
मात्र अंटार्क्टिकामध्ये पोस्ट ऑफिस असलं तरी, तिथे पोस्ट पोहोचवण्याची सोय नव्हती. म्हणून ही सर्व पत्रं प्रथम गोव्यातील वास्को येथील 'नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च' (NCPOR) येथे पोहोचवली जातात.
Dakshin Gangotri Post Office : अंटार्क्टिकासाठी पाठवलेलं पत्र नक्की जातं कुठे?
जेव्हा तुम्ही अंटार्क्टिकाला पत्र पाठवता आणि त्यावर पिन कोड 403001 लिहिता, ते पत्र गोव्याच्या NCPOR संस्थेकडे जातं. ही संस्था भारतीय अंटार्क्टिक मोहिमांचं प्रमुख केंद्र आहे. ही पत्रं पुढे संशोधकांमार्फत अंटार्क्टिकामध्ये पोहोचवली जातात.
तिथे पोहोचल्यावर ती रद्द (cancel) केली जातात, म्हणजे टपाल टिकिटावर एक विशेष शिक्का मारला जातो. नंतर त्या पत्रांची प्रत किंवा मूळ पत्र भारतात परत पाठवली जाते.
Indian Antarctic Programme : भारताचं अंटार्क्टिकाशी अनोखं नातं
या प्रक्रियेमुळे गोव्याचा पिन कोड 403001 हा अंटार्क्टिकाशी जोडला गेला. गोवा आणि अंटार्क्टिका या दोन टोकांच्या ठिकाणांमध्ये असलेलं हे अनोखं आणि वैज्ञानिकदृष्ट्या रोमांचक नातं आजही कायम आहे.


















