एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'त्या' बलात्कारी साधूचं 23 वर्षीय तरुणीने गुप्तांगच कापलं
नवी दिल्ली : अनेक वर्षांपासून सातत्याने बलात्कार करणाऱ्या नराधम साधूचं एका 23 वर्षीय तरुणीने गुप्तांगच कापलं आहे. केरळमध्ये ही धक्कादायक घटना घडली. धक्कादायक म्हणजे या नराधम साधूला पीडित तरुणीच्या आईचीही साथ होती.
केरळमधल्या पनमाना आश्रमातील गंगेसानंद साधू पूजा करण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीच्या घरी जात होता. जवळपास सहा वर्ष तो त्या तरुणीवर सातत्यानं बलात्कार करत होता. शुक्रवारी रात्री पुन्हा तो साधू पीडित तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करत होता. त्यावेळी वैतागलेल्या तरुणीने थेट चाकूने, त्याचं जनेंद्रीयच कापलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा साधू पीडित तरुणीवर सहा वर्षांपासून बलात्कार करत होता. तर पीडित तरुणीनं सांगितलं की, पूजा करण्याच्या बहाण्याने हा साधू तिच्या घरी येत होता. पण गेल्या दोन दिवसांपासून तिला धमकावण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी साधूवर लौंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यावेळी त्याने पीडित तरुणीचे आरोप फेटाळले आहेत. तसेच आपण स्वत: आपलं गुप्तांग कापल्याचा दावा त्यानं केला आहे.Kerala: Girl chopped off genitals of inmate from Panmana Ashram in Kollam, who allegedly molested her for last 6 yrs; Man hospitalized. pic.twitter.com/yT1Gji6TV7
— ANI (@ANI_news) May 20, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement